मुख्य मजकुरावर जा
Monday, 14 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 25 December 2022 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

कोऱ्हाळे बु.येथे विनापरवाना देशी दारू विक्री करणाऱ्यावर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल .

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
December 25, 2022 1 मिनिट वाचन 8,518 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी- फिरोज भालदार

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत कोऱ्हाळे बु. ता. बारामती जि. पुणे येथे दि. 24/ 12/ 2022 रोजी 6.30 वाजण्याच्या सुमारास कोऱ्हाळे गावच्या हद्दीमध्ये विश्वजीत शांताराम चव्हाण हा इसम आपले ताब्यात असलेली बेकायदेशीर बिगर परवाना देशी दारूच्या सखु संत्रा टँगो प्रीमियम नावाच्या 180 मिली मापाच्या एकूण 12 शिलबंद बाटल्या प्रत्येकी 70 रुपये दराच्या अशा एकूण 840 रुपये किमतीचा माल जवळ बाळगून

विक्री करत असताना वडगाव निंबाळकर पोलिसांच्या निदर्शनास आल्यास पोलिसांनी सर्व माल जप्त केला आहे व वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन मध्ये

विश्वजीत शांताराम चव्हाण याच्यावर कुंडलिक अशोक कडवळे पोलीस नाईक वडगाव निंबाळकर पो . स्टे. यांच्या फिर्यादीवरून प्रो अॅ कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे पो .ना . फणसे हे करीत आहेत.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख