राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

इतर

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा बैठक व पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी बारामती आणि परिसरातील कर्तृत्ववान महिलांना “नवदुर्गा पुरस्कार” तसेच समाज जागृती करणारे पत्रकारांना ‘आदर्श पत्रकार सन्मान तसेच गोहत्या प्रतिबंधक सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ‘पोलीस अधिकारी सन्मान सोहळा” हे पुरस्कार विविध मान्यवरांना प्रदान करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय महाकाल सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये दीपक भाई सपके, अजय भाई पाखी, राजेश केतकर, चेतन भाऊ भोपी, मारुती कांबळे, सुश्रुत हत्तरगे, रोहन भाऊ माने, हेमंत भाऊ बच्चाव, अमित जी बगाडे, युवराज काळे, गुरुवर्य प्रकाश भाऊ शिंदे, विशाल काळे व सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना दीपक भाई सपके यांनी सांगितले की, समाजातील तरुण पिढीने धर्म वाचवण्यासाठी पुढे यावे लागेल, आपला धर्म आपण जपला पाहिजे. इतर धर्मातून होणारे अतिक्रमण, धर्मांतर तसेच इतर चुकीच्या घटनांवर वेळीच आवाज उठवला पाहिजे. घरातील एक व्यक्ती धर्मकार्यासाठी असला असावा. समाज घडवताना धर्म महत्त्वाचा पाया आहे आपल्या मुलांना लहानपणापासूनच धर्माभिमानी बनवा व आदर्श हिंदू राष्ट्र घडवा असे यावेळी आवाहन केले. दरम्यान यावेळी राष्ट्रीय महाकाल सेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवड पत्र देण्यात आले.