1 min read

नवी मुंबईत NCB ची कारवाई; ₹२६.४८ कोटींचे ड्रग्ज जाळून नष्ट

प्रतिनिधी

अंमली पदार्थविरोधी विभागाने मोठी कारवाई करत मागील काही महिन्यांत जप्त करण्यात आलेल्या मेफेड्रोन, गांजा, अफू आणि इतर ड्रग्जचा नाश केला आहे. या खेपांची एकूण किंमत तब्बल ₹२६.४८ कोटी इतकी आहे.

विशेष यंत्रणांच्या उपस्थितीत ही सर्व अंमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले. हे ड्रग्ज विविध राज्यांमध्ये चालवलेल्या धडक कारवायांदरम्यान जप्त झाले होते.

अंमली पदार्थ कायद्याच्या कलमानुसार, कोर्टाच्या आदेशानेच ही कारवाई करण्यात आली. NCB च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या ड्रग्जच्या नाशामुळे मोठ्या प्रमाणावर तरुणाई वाचवली गेली आहे.

ड्रग माफियांविरुद्ध NCB आणखी कठोर भूमिका घेणार असून, विशेषत: शाळा–कॉलेज परिसरात विक्री करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.