प्रतिनिधी
अंमली पदार्थांचा विळखा तोडण्यासाठी नागपूर पोलिसांनी ‘ऑपरेशन थंडर’ नावाची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत शहरातील तब्बल १८९ ठिकाणं ड्रग विक्रीची हॉटस्पॉट्स असल्याचं उघड झालं आहे.
यात कॉलेज कॅम्पस, बार, पब, लॉजिंग वसाहती, तसेच काही हॉटेल परिसरांचा समावेश आहे. या ठिकाणी गुप्तपणे ड्रग्ज विक्री केली जात असल्याचे तपासात समोर आले.
पोलिसांनी या मोहिमेत अनेक ठिकाणी छापे टाकले असून, काही पेडलर्सना अटक करण्यात आली आहे. तरुणाईवर लक्ष ठेवून गुप्तहेर नियुक्त करण्यात आले आहेत.
नागरिक, पालक आणि शाळा व्यवस्थापनाला या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.