• Home
  • माझा जिल्हा
  • सुधीरभाऊंच्‍या भेटीने पांडूरंग भेटीचा आनंद – प्रा. दैवत बोरकर
Image

सुधीरभाऊंच्‍या भेटीने पांडूरंग भेटीचा आनंद – प्रा. दैवत बोरकर

प्रतिनिधी

प्रा. दैवत बोरकर यांचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला सत्‍कार.

दैवत बोरकर यांनी शोधप्रबंधाच्‍या माध्‍यमातुन व्‍यक्‍त केलेली सद्भावना लाख मोलाची – सुधीर मुनगंटीवार

ज्‍येष्‍ठ नेते, कार्यक्षम, कार्यतत्‍पर लोकप्रतिनिधी, विकासपुरूष अशी अनेक विशेषणे ज्‍यांच्‍या कर्तृत्‍वासमोर थिटी पडावीत असे सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची आज झालेली भेट माझ्यासाठी संस्‍मरणीय ठरली. सुधीरभाऊंनी माझे केलेले स्‍वागत माझ्यासारख्‍या सामान्‍य प्राध्‍यापकाला बहुमान देवून गेले.

सुधीरभाऊंची सहृदयता, संवेदनशीलता, त्‍यांचे उत्‍तुंग कार्य या सर्व बाबींचा उहापोह माझ्या शोध प्रबंधात मी जरी केला असला तरी आज मला प्रत्‍यक्ष पांडूरंग भेटीचा आनंद झाल्‍याची प्रतिक्रिया महात्‍मा ज्‍योतीबा फुले कनिष्‍ठ महाविद्यालय तळोधी (बाळापूर) येथील प्राध्‍यापक दैवत बोरकर यांनी व्‍यक्‍त केली. २५ डिसेंबर रोजी प्रा. दैवत बोरकर यांनी वने व सांस्‍कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी प्रा. दैवत बोरकर यांचा शाल, श्रीफळ आणि तिरंगा ध्‍वज भेट देत सत्‍कार केला व आचार्य पदवी प्राप्‍त केल्‍याबद्दल त्‍यांचे अभिनंदन केले.

लोकप्रतिनिधी म्‍हणून मी केलेल्‍या कार्याचा गौरव शोधप्रबंधाच्‍या माध्‍यमातुन करत माझ्याविषयी जी सद्भावना प्रा. दैवत बोरकर यांनी व्‍यक्‍त केली ती माझ्यासाठी लाख मोलाची आहे अशी भावना सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली व दैवत बोरकर यांना त्‍यांच्‍या पुढील कार्यासाठी शुभेच्‍छा दिल्‍या.

महात्‍मा ज्‍योतीबा फुले कनिष्‍ठ महाविद्यालय तळोधी (बाळापूर) येथील प्राध्‍यापक दैवत बोरकर यांनी ‘‘सुधीर मुनगंटीवार यांचे राजकीय नेतृत्‍व’’ – एक चिकित्‍सक अध्‍ययन (१९९५ – २०१५) या विषयावर आचार्य पदवीसाठी सादर केलेल्‍या शोधप्रबंधाला गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्‍या माध्‍यमातुन मान्‍यता प्रदान करत पीएचडी घोषीत करण्‍यात आली आहे. पीएचडी घोषीत झाल्‍यानंतर प्रा. दैवत बोरकर यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026