मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Friday, 9 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

बारामती पंचायत समिती निंबुत गटातून किरण काकडे लढवणार निवडणूक.

mnewsmarathi 20 Oct 2025 1 मिनिट वाचन 8,792 वाचन

प्रतिनिधी.
सध्या सर्वत्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपली इच्छा नेत्यांकडे व्यक्त करीत निवडणूक लढवण्याचे संकेत देण्यास सुरुवात केली आहे आज आमच्या प्रतिनिधीशी बोलताना किरण काकडे यांनी देखील बारामती पंचायत समिती साठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून नींबूत गटातून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून किरण काकडे यांनी अनेक अपंग बांधवांना न्याय मिळवून देण्याचे काम बारामती तालुक्यामध्ये केले आहे किरण काकडे हे उच्च शिक्षित असून तरुण पिढीचा त्यांच्याकडे असलेला कल पाहता यावर्षी बारामती तालुक्यात वेगळे चित्र पाहायला मिळणार का. लवकरच प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून व किरण काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बारामती पंचायत समिती नींबूत गटातील युवकांच्या भव्य मेळावा घेणार असल्याचे किरण काकडे यांनी यावेळी बोलताना सांगितले

लेखक

mnewsmarathi

M News Marathi