• Home
  • माझा जिल्हा
  • निरा येथील आरती ट्रान्सपोर्ट उद्योग समूहाचे सर्वेसर्वा राजेंद्र भोसले यांचा वाढदिवस उत्साहात.
Image

निरा येथील आरती ट्रान्सपोर्ट उद्योग समूहाचे सर्वेसर्वा राजेंद्र भोसले यांचा वाढदिवस उत्साहात.

प्रतिनिधी

निरा  मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविल्याने कार्यक्रमाला भव्यता प्राप्त झाली.

कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे म्हणून राज्यसभा खासदार नितीन काका पाटील, महाराष्ट्र राज्याचे पुनर्वसन राज्यमंत्री मकरंद पाटील, माजी आमदार प्रभाकर घाडगे, फलटणचे माजी आमदार दीपक चव्हाण, तसेच सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) चे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक, खरेदी-विक्री संघाचे पदाधिकारी, विविध संस्थांचे चेअरमन-संचालक, वाठार जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी तसेच हजारो नागरिक आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला. नागरिकांचा झालेला हा प्रचंड प्रतिसाद भोसले यांच्या कार्याबद्दलचे प्रेम व विश्वास अधोरेखित करणारा ठरला.

शिवसाई मंगल कार्यालयात आकर्षक सजावट, ढोल-ताशांचा निनाद, वारकरी ढोल ताशा पथकाचा जलद नाद आणि उत्साही कार्यकर्त्यांच्या जयघोषामुळे वाढदिवस सोहळा उत्सवमय वातावरणात पार पडला.
राजेंद्र काका भोसले यांच्या सामाजिक बांधिलकी, मदतीचा हात आणि सर्वसमावेशक कार्यपद्धतीमुळे हा कार्यक्रम नीरासह संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026