• Home
  • क्राईम
  • चोपडज येथील दरोडयाचा गुन्हा उघडकीस, स्थानिक गुन्हे शाखा व वडगाव निंबाळकर पो.स्टे.ची संयुक्त कारवाई
Image

चोपडज येथील दरोडयाचा गुन्हा उघडकीस, स्थानिक गुन्हे शाखा व वडगाव निंबाळकर पो.स्टे.ची संयुक्त कारवाई

प्रतिनिधी

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे चोपडज, ता. बारामती, जि. पुणे येथे दिनांक २८/११/२०२२ रोजी रात्री ०२.०० वा. चे सुमारास फिर्यादीचे राहत्या घरात अनोळखी चोरटयांनी येऊन फिर्यादीची घराचे पाठीमागील सेफ्टी दरवाजाचे आतील कडी काढुन घरात प्रवेश करून बेडरुममध्ये येवून एक उंच असलेल्या आरोपीने फिर्यादीचे तोंड हाताने दाबुन चाकुचा धाक दाखवून तुम चुप रहो आपके पास जो है वह दे दो असे हिंदीत बोलून दुसरे आरोपीने फिर्यादीचे गळ्यातील तीन तोळा वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र जबरदस्तीने कटरने कापुन घेवुन व दोन्ही हातातील ५ तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या काढून बेडरुममध्ये असलेले लोखंडी कपाटातील हिरे, सोन्याचे व चांदीचे दागिने व रोख रक्कम ८५ हजार रुपये असा एकुण १०,७७,५००/- किमतीचा माल जबरदस्तीने चोरी करुन चोरुन नेला होता स्वायत वडगाव निवाळकर पोलीस स्टेशन येथे गु. रजि.नं. ४१५/२०२२, भा.दं.वि. कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता,सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हा उघडकीस आणण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण श्री. अंकित गोयल सो.. मा. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग श्री. आनंद भोईटे, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग श्री. गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण श्री. अविनाश शिळीमकर व वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. सोमनाथ लांडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पो.स. ई. अमित सिद-पाटील, सहा फौज, रविराज कोकरे, बाळासाहेब कारंडे, पोहचा. स्वप्निल अहिवळे, अभिजीत एकशिंग, सचिन घाडगे, राजू मोमीन, विजय कांचन, आसिफ शेख, सहा फौज, काशीनाथ राजापुरे, वडगाव निंबाळकर पो.स्टे. कडील पो.हवा.

सुर्यकांत कुलकर्णी, पो.ना. हिरामण खोमणे, भाउसाहेब मारकड, पो. कॉ. पोपट नाळे, अमोल भुजबळ, नामदेव साळुंके यांची संयुक्त पथके तयार करून त्यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिलेल्या होत्या.सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलीसांना पुढे होते त्याकरीता पोलीस पथकाने गोपनीय बातमीदारामार्फत बातमी काढली असता सदरचा गुन्हा हा संदिपान झुनझुन्या भोसले याचे टोळीतील सदस्याने केला असल्याची माहिती मिळाल्याने आरोपी नामे १) संदीपान झुनझुन्या भोसले, रा. पिंपळी, ता. बारामती, जि. पुणे. २) शरद झुंनशून्या भोसले, मूळ रा. पिंपळी, ता. बारामती, जि. पुणे, सध्या रा. कासुर्डी, ता. दौड, जि.पुणे, ३) अमोल नहाना काळे, रा. पोबलवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर, ४) रितेश अर्जुन काळे, रा कासुर्डी, ता. दौड, जि. पुणे, ५) पांड्या उर्फ पांडुरंग गोरख उर्फ गोरया भोसले वय २५ वर्षे, मूळ रा टाकली, ता. करमाळा, जि. सोलापूर, सध्या रा. कासुर्डी, ता. दौड, जि. पुणे यांना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे. त्यांचे ३ साथिदारांचा शोध चालु आहे. सदरचा गुन्हा हा पाच पेक्षा जास्त आरोपींनी केलेला असल्याने गुन्हयास दरोडयाचे वाढीव कलम लावण्यात आले आहे. सदर गुन्हयातील अटक आरोपींकडून गुन्हयात गेले मालापैकी सोन्याचे कानातील टॉप्स व चांदीच्या पट्ट्या जप्त करण्यात आलेल्या असून गुन्हयात वापरलेली होंडा कंपनीची युनिकॉन मोटार सायकल जप्त करण्यात आलेली आहे ती सुध्दा आरोपींनी चोरून आणलेली असून त्याबाबत तपास चालू आहे. गुन्हयातील आरोपींना दिनांक ०५/०१/२०२३ रोजीपर्यंत पोलीस

Releated Posts

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवडलेल्या मुसक्या 

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026

सहकारनगरातील पद्मावती परिसरात मध्यरात्री वाहनांची तोडफोड, तब्बल १५ वाहनांचे नुकसान

प्रतिनिधी पुणे – सहकारनगरमधील पद्मावती परिसरात बुधवारी मध्यरात्री घडलेल्या वाहन तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByBymnewsmarathi Jan 22, 2026

बीडमध्ये जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांचा मृतदेह कारमध्ये आढळला!!

प्रतिनिधी बीड येथील वस्तू व सेवा कर (जीएसटी) कार्यालयात कार्यरत राज्य कर निरीक्षक सचिन नारायण जाधवर (वय ३५)…

ByBymnewsmarathi Jan 18, 2026