प्रतिनिधी –
मा. जिल्हाधिकारी सो. पुणे यांनी संपूर्ण पुणे ग्रामीण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम (1) व (3) चा अंमल जारी करून विनापरवाना पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव जमाविणेस, मिरवणूक काढणे, वाद्य वाजवण्यास मनाई केलेली असताना देखील तसेच ध्वनीक्षेपकाचा वापर करणे पूर्वी ध्वनी प्रदूषण विनिमय व अधिनियम 2000 मधील तरतुदीनुसार स्थानिक पोलीस स्टेशन कडील ध्वनिक्षेपक वापराचा परवाना घेणे बंधनकारक असताना देखीलदि. 4 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9.50 वा सुमारास मौजे माळेगाव खु॥ ता. बारामती जि. पुणे या गावचे हद्दीतील निरा डावा कॅनॉलचे जवळ टाटा कंपनीचे 407 मॉडेल टेम्पो क्रमांक एम डब्ल्यू आर 3976 मॉडीफाय केलेला वाहन व त्यातील असेंबल साऊंड सिस्टिम हे वाजवीत असताना माळेगाव पोलिसांच्या निदर्शनास आले असता .
धार्मिक कार्यक्रम निमित्त पोलीस स्टेशन कडील कोणतीही परवानगी न घेता तसेच पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव जमवून पोलिसांसमक्ष इसम संतोष विठ्ठल शिंदे रा. शिवनगर माळेगाव बु. ता. बारामती जि. पुणे व चव्हाण नाव व पत्ता माहित नाही ह्या व्यक्तींनी विनापरवाना मिरवणुकीचे आयोजन करून वाद्य वाजवीत असताना माळेगाव पोलिसांना मिळून आले यावरून पो .काॅ . अमजद शेख माळेगाव पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादीवरून म.पो.का.कलम 135 सह ध्वनी प्रदूषण विनीमय व निमंत्रण अधिनियम 2000 चे कलम 5 ,5A, 8 या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास पो.ना. ज्ञानेश्वर सानप हे करीत आहे.