मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
इतर

महाराष्ट्र सावकार ग्रस्त शेतकरी समिती च्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी अमित बगाडे.

mnewsmarathi 06 Jan 2023 1 मिनिट वाचन 9,733 वाचन

संपादक मधुकर बनसोडे

महाराष्ट्र सावकार ग्रस्त शेतकरी समिती च्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी अमित लक्ष्मण बगाडे यांची निवड. ही निवड बालासाहेब भाबट खांदगावकर प्रदेश अध्यक्ष यांच्या आदेशाने करण्यात आली. पुणे जिल्ह्यामधील सावकार ग्रस्त शेतकरी व अन्य नागरिकांना जर कोणता सावकार त्रास देत असेल तर त्या शेतकरी, श्रमिक वर्गाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून त्यास आम्ही संघटनेच्या माध्यमातून न्याय देऊ असे प्रतिपादन अमित बगाडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले. बारामती लाईव्ह चे मुख्य संपादक निर्भीड पत्रकार स्पष्ट बोलणे म्हणून अमित बगाडे यांची ओळख आहे. जसं बारामती लाईव्ह च्या माध्यमातून जनतेला आम्ही न्याय देण्याचे काम केले त्याच पद्धतीने महाराष्ट्र सावकार ग्रस्त शेतकरी समितीच्या माध्यमातून देखील अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असे देखील अमित बगाडे यांनी यावेळी सांगितले.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi