• Home
  • ताज्या बातम्या
  • बुवासाहेब हुंबरे मित्र परिवार आयोजित.सोमेश्वर प्रीमियर लीग 2025 चे विजेते संघ 
Image

बुवासाहेब हुंबरे मित्र परिवार आयोजित.सोमेश्वर प्रीमियर लीग 2025 चे विजेते संघ 

दिनांक 23 डिसेंबर ते 27 डिसेंबर या कालावधीत पार पडलेल्या टेनिस बॉल फुल पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये बारामती ग्रामीण मधील जवळपास पावणेदोनशे क्रिकेट पट्टूंनी सहभाग घेतला होता. हे सर्व खेळाडू वेगवेगळ्या 12 संघांमध्ये लिलावाद्वारे विभागले गेले होते.
यामध्ये डी जी शिंदे (मोरगाव) यांच्या मालकीचा *डी जी लायन्स*, शरद नाना खुडे यांचा *शरद नाना खुडे ११* संघ, नऊ फाटा येथील *सचिन आर्ट्स ब्लास्टर्स*, मुरूम येथील दत्तात्रय सोनवणे सरांचा *डी एस पँथर्स*, संकेत भैया जगताप यांचा *मल्लिकार्जुन वॉरियर्स*, वडगाव निंबाळकर येथील संग्राम जाधव यांचा *श्रीनाथ साहेब टायगर्स*, कोऱ्हाळे येथील हेमंत गडकरी यांचा *यंग इलेव्हन*, वाघळवाडी येथील जितू भैया सकुंडे यांचा *वाघळवाडी टायगर्स*, पांढरवस्ती चोपडज येथील उमेश गाडे यांचा *सी एस के चोपडज*, गोजुबावी येथील आतिश गटकळ यांचा *मोरया फाइटर्स*, करंजे येथील अमर पठाण यांचा *झीशान स्मॅशर्स* , करंजे पूल शेंडकरवाडी येथील किरण शेंडकर व भाऊसाहेब हुंबरे यांचा *ओम वॉरियर्स* अशा बारा संघामध्ये अतिशय चुरशीने ही स्पर्धा खेळली गेली. *श्रीनाथ साहेब टायगर्स वडगाव निंबाळकर हा संघ सलग दुसऱ्या वर्षी विजेता ठरला*. डी जी लायन्स मोरगाव हा संघ उपविजेता ठरला.
वाघळवाडी टायगर्स या संघाने तृतीय क्रमांक पटकावला, तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला करंजे येथील झीशान स्मॅशर्स. या खेळामध्ये मॅन ऑफ द सिरीज अक्षय तावरे या खेळाडूंनी पटकवले
या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक संग्राम सोरटे यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख रक्कम रुपये *१,११,१११* दिले. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस *सौ रोहिणीताई ढोले* संस्थापिका अध्यक्ष एस एम के फाउंडेशन मोरगाव यांचेमार्फत रोख रुपये *५५,५५५* प्राप्त झाले. रेणुका इंडस्ट्रीज भोसरी पुणे यांचे मालक *श्री चांगदेव धुर्वे* शेंडकरवाडी यांनी रोख रक्कम रुपये *२५,५५५* दिले. करंजे गावचे पुणे येथील बांधकाम व्यवसायिक मंगलमूर्ती डेव्हलपर चे मालक *श्री शेखरदादा भगत* यांनी रोख रक्कम रुपये *२५,५५५* दिले. श्री संदीप उर्फ पिंटू शेठ मोडक वडकी आणि पैलवान बाळासाहेब मदने यांनी ट्रॉफी दिल्या, करंजेपुल गावचे माजी सरपंच वैभव गायकवाड यांनी मॅन ऑफ द सिरीज साठी टीव्ही दिला, बेस्ट बॅटर साठी उद्योजक धीरज गायकवाड आणि योगेश भिलारे यांनी सायकल दिली, तसेच बेस्ट बॅट्समन साठी श्री अजित आप्पासाहेब गायकवाड यांनी सायकल दिली. श्री दिग्विजय कैलास मगर यांनी स्टंप व बॉल दिले. नेहमीप्रमाणे चौधरवाडी येथील पुणेस्थित व्यावसायिक श्री मुकेश चौधरी यांनी बेस्ट बॅट्समन साठी बॅट दिल्या. बेस्ट बॉलरसाठी श्री हर्षल जगताप यांनी शूज दिले. मंडप व्यावसायिक श्री प्रतापराव गायकवाड आणि विजयराव कोळपे यांनी रस्त्यावर कमानी उभारल्या. शिवा काका कारंडे फाउंडेशन यांच्या अध्यक्ष रेणुकाताई स्वप्निल कारंडे यांनी मंडपासाठी सहकार्य केले. तसेच परिसरातील प्रदीप शेंडकर, बाळासाहेब शिंदे, सुखदेव शिंदे, भरत हगवणे, धनंजय गायकवाड, राहुल शेंडकर, हनुमंत शेंडकर, अमोल वायाळ, दत्ताआबा फरांदे, या सर्वांनी विशेष सहकार्य केले. युट्युब साठी मयूर वायाळ, मंगेश कदम, जीवन सावंत यांनी सहकार्य केले. या स्पर्धेसाठी श्री एस एम गलांडे यांनी मैदान उपलब्ध करून दिले.
या स्पर्धेसाठी श्री प्रमोदकाका काकडेदेशमुख, श्री रमाकांतजी गायकवाड, श्री राजवर्धन दादा शिंदे, श्री ऋषी आबा गायकवाड, श्री विलासनाना शेंडकर, श्री ताराचंद शेंडकर, श्री शिवाजीराव शेंडकर, श्री माणिकराव काळे, श्री सुनील ढोले, मदनराव काकडे, सुचित्रा ताई साळवे यांनी उपस्थित राहुन खेळाडूंना प्रोत्साहित केले.
ही स्पर्धा बारामतीतील ग्रामीण भागाच्या क्रिकेटपटूंना मोठी पर्वणी ठरली आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना या स्पर्धेमुळे खूप मोठे व्यासपीठ मिळाले आहे. या स्पर्धेत ग्रामीण भागातील सर्व गाजलेले स्टार खेळाडू आवर्जून भाग घेत असतात. त्यामुळे ही स्पर्धा अतिशय रंगतदार होत असते. कमी वेळेत प्रसिद्धीस पावलेली खेळाडूंच्या विश्वासास पात्र ठरल्यामुळे नावावर पास आलेली आहे. या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आजूबाजूच्या तालुक्यातून खेळाडूंचे सतत फोन येत असतात.
या स्पर्धेचे संपूर्ण नियोजन *श्री किरण शेंडकर*, करंजे गावचे सरपंच *श्री भाऊसाहेब हुंबरे*, *मयुर शेंडकर*, *जितू भैया सकुंडे*, *नितीन साखरे*, *पापा मुलानी*, *शशिकांत जेधे सर*, *दत्तात्रय सोनवणे सर*, *दिव्यतेज शेंडकर*, *ओम शेंडकर* तसेच परिसरातील सर्व खेळाडू जिद्दीने, चिकाटीने, अतिशय मेहनतीने नेहमीच करत असतात. आजच्या बक्षीस वितरण समारंभात सोन्या चांदीचे व्यापारी तथा राज्य पातळीवरचे व्यापाऱ्यांचे नेते *श्री किरणशेठ आळंदीकर* यांनी पुढील वर्षीसाठी नाणेफेकीचे चांदीचे नाणे देणार असल्याचे आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाचे संपूर्ण समालोचन अमर यादव आणि विजय साकोरे यांनी केले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून स्वप्निल काकडे आणि त्यांचे सहकारी यांनी नियमांचे तंतोतंत पालन करून कामकाज पाहिले.
या सर्वांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा सुरळीत पार पडली. या स्पर्धेसाठी आजूबाजूच्या सर्वच गावांमधून प्रेक्षक उपस्थित राहून खेळाडूंना प्रतिसाद दिला प्रतिसाद दिला, बक्षिसांची खैरात केली यामुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले.
खेळावर प्रेम करणाऱ्या दानशूर व्यक्तीमुळेच अशा स्पर्धा पार पाडण्यासाठी आम्हाला ताकद मिळते, या सर्व दानशूर व्यक्तींचे आभार मानत पुढच्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये अजून काही सुधारणा करून यापेक्षा अतिशय सुंदर नियोजन पद्धतीने पुढची स्पर्धा दिमाखात करणार आहोत असे श्री किरण शेंडकर यांनी सांगितले. सरपंच श्री भाऊसाहेब हुंबरे यांनी सर्व उपस्थित आमचे स्वागत केले आणि आभार मानले.

Releated Posts

निंबुत–कांबळेश्वर जिल्हा परिषद गटातून प्रियराज (अभिजीत )सतीशराव काकडे मैदानात?

प्रतिनिधी निंबुत–कांबळेश्वर (ता. बारामती) जिल्हा परिषद गटातून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अभिजीत सतीशराव काकडे हे मैदानात उतरण्याच्या तयारीत…

ByBymnewsmarathi Jan 16, 2026

सिनेअभिनेत्री सिमरन खेडकर यांची श्री. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयास सदिच्छा भेट.

श्री. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय निंबुत येथे आज वार शुक्रवार दि. १६/०१/२०२५ रोजी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध व लोकप्रिय…

ByBymnewsmarathi Jan 16, 2026

शाई पुसून पुन्हा मतदान करण्याचा प्रयत्न गुन्हा – राज्य निवडणूक आयोगाचा इशारा.

प्रतिनिधी. मतदान प्रक्रियेची शुचिता आणि पारदर्शकता अबाधित राखण्यासाठी राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे.…

ByBymnewsmarathi Jan 15, 2026