मुख्य मजकुरावर जा
Monday, 7 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 30 December 2025 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

पुण्याच्या कल्याणीनगर भागात ‘मसाज पार्लरच्या’ नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांची धाड अन् दोघांना अटक

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
December 30, 2025 1 मिनिट वाचन 8,511 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

 

पुण्यातील कल्याणीनगर भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसाय येरवडा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी मसाज पार्लरचा व्यवस्थापक आणि त्याचा सहकारी अशा दोघांना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईमुळे शहरातील मसाज सेंटरच्या (Pune News) नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. (Latest Marathi News)

 

अटक करण्यात आलेल्यांची नावे मोतीबर समसुलहक रेहमान (वय 31, रा. संजय पार्क, विमाननगर, मूळ रा. आसाम) आणि अब्दुल मोनुउद्दीन आवाल (वय 19, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी आहेत. या प्रकरणी पोलीस शिपाई बालाजी सोगे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

 

आरोपींविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर परिसरातील एका संकुलात मसाज सेंटरच्या आडून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती येरवडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित मसाज सेंटरवर छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी तेथून काही तरुणींना ताब्यात घेतले असून, त्यांची पुढील कार्यवाही सुरू आहे.

 

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान आणि गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याआधीही कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्ग आणि बाणेर भागातील एका लॉजमध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसाय पोलिसांनी उघडकीस आणला होता. तसेच कोंढव्यातील एका मसाज सेंटरवर छापा टाकून तरुणींची सुटका करण्यात आली होती. त्या प्रकरणातही मसाज सेंटरच्या चालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा गैरप्रकारांच्या तक्रारी सातत्याने पोलिस आयुक्तांकडे येत होत्या. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार शहरात विविध ठिकाणी तपास आणि छापे टाकण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात येत आहे.

 

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख