परळीचे डॉ.रवींद्र जगतकर यांनी महात्मा फुले योजनेअंतर्गत ३४ हजार रुग्णांना मिळवुन दिला शस्त्रक्रियेचा लाभ

परळी वैजनाथ / ठाणे (प्रतिनिधी) शासनाच्या वतीने महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून नागरीकांना अनेक आजारांवर मोफत इलाज करण्याची सुविधा आहे.परंतु माहितीअभावी अनेक नागरीक याचा लाभ घेत नाहीत परळीचे भुमिपुत्र डॉ.रवींद्र जगतकर यांनी ठाणे जिल्ह्याचे महात्मा फुले जनआरोग्य योजना जिल्हा समन्वयक म्हणुन 34 हजारापेक्षा अधिक रुग्णांना या योजनेतून शस्त्रक्रियेचा लाभ मिळवुन दिला आहे. शस्त्रक्रियेसाठी […]

Continue Reading

बारामतीचा पश्चिम भाग थंडीने गारठला

प्रतिनिधी. बारामती तालुक्यातील प्रामुख्याने निंबुत,सोमेश्वर भागामध्ये थंडीची चांगलीच लाट उसळलेली आहे या वाढलेल्या थंडीमुळे जागोजागी शेकोट्या पाहावयास मिळत आहेत. कमालीचा परा घसरल्याने नागरिक दिवसभर अंगामध्ये उबदार कपडे घालूनच आपली दैनंदिन कामे करत आहेत. मात्र या वाढलेल्या थंडीने वयोवृद्ध नागरिकांची चांगलीच तारांबळ देखील होत आहे. वाढलेल्या या थंडीचा फायदा शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. गहू,हरभरा, […]

Continue Reading

परळीत आ.विक्रम काळे यांची नाथ शिक्षण संस्था कार्यालयास भेट, सदस्य नोंदणीसह शिक्षकांच्या प्रश्नावर झाली चर्चा

परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- शिक्षक मतदार संघाचे आ.विक्रम काळे यांनी शुक्रवार दि.9 डिसेंबर रोजी नाथ शिक्षण संस्थेच्या कार्यालयास भेट दिली यावेळी संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे यांच्याशी आगामी निवडणुकीसाठी सदस्य नोंदणी संदर्भात चर्चा केली.तसेच शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी गुंतवले असल्याने इतर कामांची सक्ती करु नये अशा सुचना तहसिलदार सुरेश शेजुळ यांना दिल्या. शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम […]

Continue Reading

श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश….

प्रतिनिधी निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ, विद्या समिती पुणे व बारामती तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ, बारामती तालुका यांच्यावतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धा बुधवार दि.७/१२/२०२२ रोजी मिशन हायस्कूल बारामती या ठिकाणी संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील बहुतांश विद्यालयातील विद्यार्थ्यांनी […]

Continue Reading

दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त तिन्ही सेवादल प्रमुखांकडून पुष्पचक्र अर्पण

प्रतिनिधी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी, नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएम, एडीसी , यांनी दिवंगत जनरल बिपिन रावत, पीव्हीएसएम, युवायएसएम, एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, एडीसी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी , खडकवासला येथील आयकॉनिक हट ऑफ रिमेंबरन्स […]

Continue Reading

बाल निरीक्षक गृहात राहणारा अनाथ बनला शासनाचा अधिकारी

प्रतिनिधी काही वर्षांपूर्वी अक्षर ओळख होण्यापूर्वीच अगदी लहान वयात बारामती येथील बाल सुधाग्रहात दाखल झालेला अनिल माणिक जाधव. याने अनाथ म्हणून बाल निरीक्षण गृह बारामती या ठिकाणी दहावीपर्यंत शिक्षण घेतले. कुणीही जवळचे नातेवाईक नाहीत बाल निरीक्षण गृहातील इतर साथीदार हेच त्याची भावंड व बाल निरीक्षण गृहातील सर्व अधिकारी वर्ग हेच त्याचे पालक. ज्या काही सुविधा […]

Continue Reading

वडगाव निंबाळकर प्रशालेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील स्वातंत्र्य विद्या मंदिर या प्रशालेमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमासाठी बहुजन हक्क परिषद बारामती तालुका युवक अध्यक्ष […]

Continue Reading

निंबुत ग्रामपंचायतच्या वतीने महामानवास अभिवादन करण्यात आले.

संपादक मधुकर बनसोडे. ग्रामपंचायत निंबुत येथे आज सकाळी दहा वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास आदरांजली वाहून महामानवांच्या विचारांची देवाण-घेवाण करण्यात आली. यावेळी निंबुत ग्रामपंचायत सरपंच निर्मला काळे, उपसरपंच अमर काकडे, सदस्य, विद्याताई काकडे, कुमोदिनी काकडे, प्रमोद बनसोडे, नंदकुमार काकडे, ग्रामपंचायत नींबूतचे ग्रामसेवक गावडे भाऊसाहेब, क्लार्क भाऊसाहेब कोळेकर, राजेंद्र काकडे, नाना धुमाळ, […]

Continue Reading

गुजरात मधून आणलेले सिंह उद्या सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात सोडणार

मुंबई: गुजरात मधून आणलेली सिंहांची जोडी उद्या मंगळवारी सहा डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात वनमंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सोडण्यात येणार आहेत. ही सिंहांची जोडी काही दिवसांपूर्वी गुजरातेतील सक्करबाग प्राणी संग्रहालयातून मुंबईत दाखल झाली आहे. हे दोन्ही सिंह प्रत्येकी दोन वर्षे वयाचे आहेत. मुंबईतील वातावरणाशी परिचित होण्यासाठी काही काळ […]

Continue Reading

अमृत महोत्सवी वर्षात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना गती द्या

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश नागपूर ला ग्रामविकास विभागाचे भव्य ‘महारुद्र’ केंद्र उभारणार विविध विभागांकडून घेतला अमृत महोत्सवी कामांचा आढावा मुंबई, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व नियोजित कामांना गती देऊन दर्जा व वेळ यांस प्राधान्य द्या असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले. या […]

Continue Reading