क्राईम
सराफ दुकानात गोळीबार, चोरीचा प्रयत्न करणारा जेरबंद
प्रतिनिधी शिरूर शहराच्या मध्यवस्तीतील सुभाष चौक येथे सराफ दुकानात घुसून गोळीबार आणि चोरीचा प्रयत्न करणाऱ्यास ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्याच्याकडून तीन गावठी पिस्तूल आणि दोन काडतूस असा सव्वालाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शरद बन्सी मल्लाव (वय २४, रा. काची आळी, शिरूर, ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सुभाष चौक […]
मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर!
गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना धमकीचे अनेक फोन येत आहेत. आता मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवले असल्याचा संदेश मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला आहे. याबाबत ANI ने माहिती दिली आहे. “मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा संदेश आला. संपूर्ण मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे संदेशात म्हटले आहे. या संदेशानंतर मुंबई […]
हॉटेल व्यवसायिकास कोयत्याचा धाक दाखवून खंडणी मागणारा कुख्यात गुंड गजाआड
प्रतिनिधी बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कारवाई बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधील आशीर्वाद हॉटेलचे मालक फिर्यादी दीपक चंद्रकांत राऊत रा.मोतीबाग इंदापूर रोड बारामती. जिल्हा पुणे यांना दरोडा, जबरी चोरी, जिवे मारण्याचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी सचिन पाथरकर रा.आमराई, बारामती . जिल्हा पुणे .याने फिर्यादी यांचे आशीर्वाद हॉटेलमध्ये येऊन कोयत्याचा धाक […]
बारामती ! होळ मधील ढगाई देवी मंदिरामध्ये चोरी ; अज्ञात चोरट्याविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल .
प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील होळ येथील प्रसिद्ध श्री.ढगाई देवी मंदिरामध्ये दि. २८ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ७ ते दि. २९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान ढगाई देवी मंदिरामध्ये अज्ञात चोरट्याने खिडकीचे ग्रील कटावणी सारख्या वस्तूच्या सहाय्याने उचकटुन खिडकीव्दारे मंदीरामध्ये प्रवेश करून चोरी केल्याचे २९ जानेवारी सकाळी होळ येथील ढगाई देवी मंदिराचे […]
होंडा शाईन मोटार सायकल रेकॉर्ड वरील चोर आटक बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कारवाई
प्रतिनिधी दिनांक 27/01/2024 रोजी बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने एक रेकॉर्ड वरील मोटार सायकल चोर नामे आदेश रमेश देशमुख वय 23 वर्ष रा कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. यास अटक केली . पोलीस कस्टडीमध्ये असताना त्याने बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सुभद्रा मॉल व विद्या प्रतिष्ठान कॉलेज परिसरा […]
दोन भावांसाठी मित्र ठरला कर्दणकाळ; एकाचा गेला जीव, दुसरा गंभीर जखमी
प्रतिनिधी घरातून बहिण बेपत्ता झाल्यामुळे आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवकाने स्वत:च्या पोटात चाकू भोसकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मित्र असलेल्या भावंडांनी त्या युवकाला वाचविण्यासाठी धडपड केली. झटापटीत युवकाच्या हातातील चाकू एका मित्राच्या डोक्याला लागला तर दुसऱ्याच्या गळ्यात खूपसल्या गेला. त्यात एका मित्राचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरूध्द सदोष मनुष्यवधाचा […]
कोयत्याच्या धाकाने डिलिव्हरी बॉयला लुटले
प्रतिनिधी खाद्यपदार्थ घरपोच देणाऱ्या डिलिव्हरी बाॅयला कोयत्याच्या धाकाने लुटण्यात आल्याची घटना हडपसर परिसरात घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत निलेश पंडित गायकवाड (वय ३१, रा. स्वागत हाॅटेलसमोर, मांजरी बुद्रुक) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी करण, विशाल्या, मुज्ज्या, शुभ्या नावाच्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या […]
विवाहाच्या आमिषाने मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीवर बलात्कार
प्रतिनिधी मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीवर विवाहाच्या आमिषाने बलात्कार केल्याप्रकरणी सोलापूरमधील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आरोपी विराज रविकांत पाटील याच्या वडिलांची एकेकाळी सोलापूर शहरात दहशत होती. सोलापूरमधील भडकलेल्या टोळीयुद्धात रविकांत उर्फ रवी पाटील याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणी विराज रविकांत पाटील (वय ३५, रा. राॅयल पाल्म, सोरेगाव, सोलापूर) […]
सुपे पोलीस स्टेशन मध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल
प्रतिनिधी बारामती -: सुपा पोलीस स्टेशन या ठिकाणी 26 जानेवारी 2024 रोजी अखेर भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 143, कलम 147,कलम 159, कलम 427, कलम 323, कलम 295 -A,कलम 504, कलम 506,तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियम 1989 3(1)(g), 3(2)(va),3(1)(r),3(1)(s), नुसार सुपा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झाला असून संबंधित आरोपी नामे […]
पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव; खून करून तरुण पसार
प्रतिनिधी पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव करून एकाने तिचा गळा आवळून खून केल्याची घटना गोखलेनगर परिसरात घडली. पत्नीचा खून करून पसार झालेल्या तरुणाविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रेश्मा चंदर पंतेकर (वय ३०, रा. जनता वसाहत, जनवाडी, गोखलेनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी चंदर अशोक पंतेकर (वय ३३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला […]
