बबई बनसोडे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्काराने सन्मानित.

प्रतिनिधी. आज निराशिवतक्रार ग्रामपंचायातीच्या वतीने  लोकशाहीर  साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी निंबूत येतील बबई केरबा बनसोडे यांना सामाजिक व साहित्य वाचन या योगदानाबद्दल साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सुनील आण्णा पाटोळे यांच्या स्मरणार्थ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . बबई बनसोडे यांनी जवळपास आतापर्यंत 250 हून अधिक पुस्तकांचे वाचन केले आहे. […]

Continue Reading

करंजे येथे विविध उपक्रम साजरे करत उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा.

प्रतिनिधी. सोमेश्वर पंचक्रोशी मध्ये शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील विधानसभा क्षेत्र प्रमुख बंटी उर्फ राकेश गायकवाड यांच्या सौजन्याने वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यामध्ये महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध असणारे तीर्थक्षेत्र सोमायाचे करंजे या ठिकाणी जाऊन सोमेश्वराच्या चरणी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना दीर्घायुष्य लाभो व येणारा […]

Continue Reading

कन्हेरी येथे मधुमक्षिकापालन प्रशिक्षण संपन्न मधमाशांचे संवर्धन व संगोपन करणे काळाची गरज-उपविभागीय कृषि अधिकारी तुळशीराम चौधरी

पुणे, दि. 30: मानवी आयुष्यासाठी मधमाशांचे उपयुक्तता लक्षात घेता त्यांचे संगोपन व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, मधमाशी व्यवसायाच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीसह आत्मनिर्भर होण्यासही मदत होत आहे, या व्यवसायाकरिता कृषी विभागाच्यावतीने सर्वतोत्परी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन उपविभागीय कृषि अधिकारी तुळशीराम चौधरी प्रशिक्षणसत्राच्या उद्धाटनप्रसंगी केले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, राष्ट्रीय मधमाशी मंडळ नवी दिल्ली आणि […]

Continue Reading

सोमेश्वर सेवाभावी संस्थेचा सालाबाद प्रमाणे स्तुत्य उपक्रम, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर विध्यालय भाग शाळा करंजे येथील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

 प्रतिनिधी झी टाॅकिज फेम किर्तनकार ह.भ.प स्वप्निल काळाणे यांनी संस्कार या विषयावर प्रबोधन केले. पैसा कमावणे म्हणजे संस्कार नसून त्या कमावलेल्या पैशाचा वापर समाजहितासाठी देखील झाला पाहीजे हेच उत्तम संस्काराचे फलित आहे.तसेच आई वङीलांनी आपल्या मुलांना वेळ द्यावा.तरच मुले पुढे आपल्याला वेळ देतील.शेवटी आपण जे पेरतो तेच उगवते.आसा काळाणे महाराज यांनी संदेश दिला. पुरुषोत्तमदादा जगताप […]

Continue Reading

श्री.बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय निंबुत येथे शिवणकाम कार्यशाळा संपन्न…

प्रतिनिधी. विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन व जीवनकौशल्यांचा विकास घडवण्यासाठी श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालय, निंबूत येथे दि. २६ जुलै २०२५ रोजी शिवणकाम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या मूलभूत कौशल्यांची माहिती देणे आणि त्यांना स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण […]

Continue Reading

तीव्र महत्वकांक्षामुळेच कारगिल युद्ध जिंकले सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन श्री. जयपाल शिवाजी राजेभोसले मु. सा. काकडे महाविद्यालयात कारगिल युद्धातील अनुभव आणि भारताची संरक्षण सिद्धता* या कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधी. सोमेश्वर नगर: येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात संरक्षण व सामरिक शास्त्र विभाग राष्ट्रीय छात्र सेना विभाग यांच्या वतीने कारगिल विजय दिनानिमित्त आजी माजी सैनिकांचा सन्मान केला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते. या निमित्ताने कारगिल योद्धे श्री. जयपाल शिवाजी राजेभोसले, श्री. अनिल शिंदे, श्री. प्रशांत शेंडकर, श्री. विजय गोलांडे, संदीप बापुराव सावंत […]

Continue Reading

कारगिल विजय दिवस आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रतिनिधी. पिंपरे खुर्द ता. पुरंदर, जि. पुणे – श्री बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय, पिंपरे खुर्द येथे कारगिल विजय दिवस राष्ट्रभक्तीच्या उत्स्फूर्त वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वाचा संदेशही देण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन “मेरा युवा भारत, पुणे” व “श्री दत्तकृपा तरुण मंडळ, होळ (ता. बारामती)” यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात […]

Continue Reading

सदोबाची वाडी येथे तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांच्या मार्गदर्शनाखाली केळी समूह माहिती मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

प्रतिनिधी सदोबाचीवाडी येथे तालुका कृषी अधिकारी सचिन हाके सर यांचे मार्गदर्शनाखाली केळी समूह माहिती व मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी सदोबाचीवाडी येथील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे ऋषिकेश कदम यांनी AI Sugarcane विषयी माहिती दिली. त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर भेट देऊन पीक किड व रोग सर्वेक्षण पाहणी केली. […]

Continue Reading

श्री श्रेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे श्रावण मास यात्रा काळातील वाहन पार्किंग लिलाव सालाबाद प्रमाणे विक्रमी बोली 2,92,000 लावून संतोष हाके यांनी घेतला.

सोमेश्वर प्रतिनिधी. आज 11 वाजता सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरूषोत्तमदादा जगताप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजवर्धनदादा शिंदे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत लिलाव प्रक्रिया संपन्न झाली. मगरवाङी गावचे उधोजक हनुमंतराव मगर व संतोष हाके या दोघांनी लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला. हनुमंतराव मगर यांनी 2,90,000 बोली लावली होती.संतोष हाके यांनी 2,92000 बोली लावून लिलाव घेतला. यावेळी संतोष […]

Continue Reading

भारतीय पत्रकार संघ नेहमीच प्रामाणिक पत्रकारांच्या पाठीशी : गणगे पाटील

दौंड प्रतिनिधी: भारतीय पत्रकार संघ नेहमीच प्रामाणिक पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे मत भारतीय पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश गणगे पाटील यांनी व्यक्त केले. दौंड येथील पंचायत समितीच्या कार्यालयात भारतीय पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सिकंदर नदाफ यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार संघाची आढावा बैठक तसेच पद्ग्रहन सोहळ्यासह पत्रकारांसाठी कार्यशाळा देखील मोठ्या उत्साहात पार पडली.या बैठकीत पत्रकारांच्या […]

Continue Reading