*एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*

प्रतिनिधी. बारामती, दि. ४: प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्य शासनाने सुरू असलेल्या खरीप हंगामात केवळ १ रुपये भरुन पीक विम्याचा लाभ देण्याकरिता ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्यास मान्यता दिली असून शेतकऱ्यांनी १५ जुलैपर्यंत नोंदणी करुन योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. काढणी पश्चात चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी, काढणीच्या […]

Continue Reading

*पालखी प्रस्थानानंतर तळावर गतीने स्वच्छता; विभागीय आयुक्तांकडून यंत्रणेचे अभिनंदन*

प्रतिनिधी. *संपूर्ण वारी निर्मल करण्यासाठी असेच प्रयत्न करा-डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार* पुणे, दि. 4: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पालखीचे पालखी तळावरुन प्रस्थान होताच दुसऱ्याच दिवशी तळांच्या स्वच्छतेच्या कामाला गतीने सुरुवात होऊन पूर्वीसारखी चकाचक होत आहेत; विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी याबद्दल यंत्रणेचे अभिनंदन केले असून संपूर्ण वारी निर्मल करण्यासाठी असेच प्रयत्न […]

Continue Reading

‘लाडकी बहीण’योजनेसाठी कागदपत्रे जमवायला जाताना अपघात; ट्रकच्या धडकेत दुचाकीचालक ठार

प्रतिनिधी ‘लाडकी बहीण’योजनेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करायला जाताना झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. येथील वडसा-कोहमारा मार्गावरील मोरगाव टी-पॉईंटवर बुधवारी दुपारी ही दुर्घटना घडली. शिवलाल चुन्नीलाल लाडे (४२, रा. निलज, ता.अर्जुनी/मोरगाव), असे मृताचे नाव आहे. ते ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’साठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी अर्जुनी/मोरगाव तहसील कार्यालयात पत्नीसह जात होते. मात्र, एक महत्त्वाचे दस्तावेज घरी विसरल्यामुळे शिवलाल एकटेच […]

Continue Reading

येरवड्यातील बालसुधारगृहात राडा; डोक्यात फरशी घातल्याने अल्पवयीन मुलगा जखमी

प्रतिनिधी येरवडा येथील पंडीत जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रात मुलाच्या डोक्यात फरशी मारून त्याला जखमी केल्याप्रकरणी अल्पवयीनाविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. येरवड्यात पं. जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्र संचलित बालसुधारगृह आहे. रविवारी (३० जून) दुपारी एकच्या सुमारास बालसुधारगृहातील मुलांना रांगेत उभे करण्यात आले. त्यावेळी एकाने मुलाच्या डोक्यात फरशी (टाइल) मारुन त्याला जखमी केले. त्यावेळी बालसुधारगृाहतील कर्मचाऱ्यांनी […]

Continue Reading