Home
कारागृहातील बंदीवानाचा महिला रक्षकावर प्राणघातक हल्ला
प्रतिनिधी भंडारा जिल्हा कारागृहातील एका बंदीने कर्तव्यावरील महिला रक्षकावर प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बंदीवानाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिविगाळ करुन त्यानाही जीवानिशी मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकारामुळे कारागृह प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. शाम उर्फ पिटी चाचेरे, वय ३५ असे या हल्लेखोर बंदीवानाचे नाव आहे. जिल्हा कारागृह वर्ग १ येथे महिला […]
पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
प्रतिनिधी पोलिसांकडून शहरातील पब, मद्यालय चालकांविरुद्ध (रेस्टॉरंट आणि बार) कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मध्यरात्री दीडपर्यंत पब आणि मद्यालय सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. मात्र, त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब आणि मद्यालयांविरुद्ध कारवाई करावी, असे आदेश पोलिसांना दिले आहेत. […]
वाकडमध्ये दोन हुक्का पार्लरवर कारवाई
प्रतिनिधी वाकड येथे हॉटेल स्पाईस फॅक्टरी आणि कस्तुरी चौकाजवळ असलेल्या हॉटेल सी डॉक या दोन हॉटेलमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर हिंजवडी पोलिसांनी कारवाई केली. त्यामध्ये ४९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हॉटेल स्पाईस फॅक्टरीचा मालक स्वप्नील डांगे (रा. पारखेवस्ती, वाकड) आणि तानाजी सयाजी देसाई (वय २८, रा. पारखे वस्ती, वाकड, मूळ – कोल्हापूर) […]
रिक्षा प्रवासी महिलेचे सात तोळ्यांचे दागिने गहाळ; पाेलिसांच्या प्रयत्नांमुळे दागिन्यांचा शोध
प्रतिनिधी श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या मुंबईतील महिलेचे सात तोळ्यांचे दागिने रिक्षात विसरल्याची घटना घडली. पोलिसांनी त्वरित तपास करून सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे रिक्षाचालकाचा माग काढला. रिक्षात विसरलेले दागिने महिलेला परत मिळवून दिले. मुंबईहून प्राजक्ता सचिन महाडिक (वय ४०) या नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी पुण्यात आल्या होत्या. विवाह समारंभ आटोपून त्या कुटुंबीयांसोबत रिक्षातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती […]
पावणेतीन कोटींची दारू जप्त : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा दारू निर्मिती, वाहतूक, विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन महिन्यांत उत्पादन शुल्क विभागाने दोन कोटी ८१ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाने १ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत छापे टाकत ४२६ गुन्ह्यांची नोंद […]
महामार्गावरील, तीर्थक्षेत्रमधील तसेच पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहे पुरेशा प्रमाणात व सुस्थितीत ठेवण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
प्रतिनिधी. पेट्रोल पंपावरील आणि तीर्थक्षेत्र मधील सार्वजनिक स्वच्छतागृह ही अस्वच्छ व दुर्लक्षित आहेत. ती फार तुटपुंजी असून अनेक ठिकाणी शौचालयात आवश्यक असणाऱ्या प्राथमिक सुविधाही नाहीत. त्यामुळे प्रवाशांना व भाविकांना खूपच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सध्याची अस्तित्वातील सर्व स्वच्छतागृहे ही सुस्थितीत ठेवावीत.विधानभवनातील सभापती यांच्या दालनात महामार्गावरील व तीर्थक्षेत्रामधील तसेच पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेबाबत बैठक झाली. […]
निवडणूक आचारसंहिता कक्षाच्या प्रतिनिधींसाठी प्रशिक्षणाचे आयोजन*
पुणे, दि.२८ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील २१ विधानसभा स्तरावरील निवडणूक आचारसंहिता कक्षाच्या प्रतिनिधींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक आचारसंहिता कक्षाच्या समन्वयक ज्योती कदम यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्रीमती कदम यांनी आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणी, तालुका स्तरावर आचारसंहिता पथक तयार करणे, आचारसंहितेच्या तक्रारींच्या निवारणासाठी दूरध्वनी अथवा […]
रत्नदीप पब्लिक स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
तासगाव प्रतिनिधी. शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सावळज येतील रत्नदीप पब्लिक स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात बक्षीस वितरणाने करण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत प्राचार्य वृषाली धेंडे मॅडम यांनी केले. तसेच प्रमुख अतिथी यांची प्रस्तावना भाग्यश्री आवटे यांनी मांडली. यावेळी दीप प्रज्वलन आणि नटराज पूजनाने […]
बारामतीच्या जागेसाठी कॉंग्रेस गटातून हालचाल. पुरंदर तालुक्यातून राजेंद्र बरकडे इच्छुक.
प्रतिनिधी एकीकडे बारामती लोकसभा मतदार संघात लोकसभेच्या निवडणुकीसाठी पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली असताना काँगेसच्या महाराष्ट्र ओबीसी सेलकडून मात्र बारामतीच्या जागेसाठी पुरंदरच्या उमेदवाराची निवड करण्यात यावी यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याचे चित्र स्पष्ट आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत खासदार पदासाठी बारामतीतून शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादीतून सुनेत्रा पवार यांची नावे चर्चेत असली तरी देखील […]
बारामतीच्या जागेसाठी कॉंग्रेस गटातून हालचाल. पुरंदर तालुक्यातून राजेंद्र बरकडे इच्छुक. बारामती प्रतिनिधी एकीकडे बारामती लोकसभा मतदार संघात लोकसभेच्या निवडणुकीसाठी पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली असताना काँगेसच्या महाराष्ट्र ओबीसी सेलकडून मात्र बारामतीच्या जागेसाठी पुरंदरच्या उमेदवाराची निवड करण्यात यावी यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याचे चित्र स्पष्ट आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत खासदार पदासाठी बारामतीतून शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादीतून सुनेत्रा पवार यांची नावे चर्चेत असली तरी देखील घराणेशाहीच्या संघर्षाला बगल देण्यासाठीच कॉंग्रेसच्या महाराष्ट्र ओबीसी सेलकडून कंबर कसली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. यावेळी कॉंग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांनी बारामती लोकसभा मतदार संघातून पुरंदरचे राजेंद्र बरकडे यांना उमेदवारी मिळावी यासाठी कॉंग्रेस ओबीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजयसिंग यादव यांच्याकडे शिफारस केली असून लोकसभेच्या ४८ जागांपैकी ९ जागा ओबीसीला मिळाव्यात अशी मागणी देखील केली आहे. त्यातच बारामती लोकसभा मतदार संघात धनगर समाजाचे प्राबल्य असून भाजपच्या ओबीसी सेलकडूनही पणदरेच्या प्रियदर्शनी कोकरे यांना रिंगणात उतरविण्याच्या चर्चा रंगल्या आहेत.यापूर्वी सन २०१४ मध्ये महादेव जानकर यांनी धनगर समाजाच्या जीवावर तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर निवडूक लढवून सुप्रिया सुळे यांना कडवे आव्हान देत भाजपची वोट बँक राखली होती. परंतु बारामती लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीने कॉंग्रेसला जागा दिल्यास भाजपचा पत्ता निश्चितच कट होणार असल्याचा विश्वास कॉंग्रेस ओबीसी सेलचे पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे यांनी व्यक्त केला.
बारामती प्रतिनिधी एकीकडे बारामती लोकसभा मतदार संघात लोकसभेच्या निवडणुकीसाठी पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली असताना काँगेसच्या महाराष्ट्र ओबीसी सेलकडून मात्र बारामतीच्या जागेसाठी पुरंदरच्या उमेदवाराची निवड करण्यात यावी यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याचे चित्र स्पष्ट आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत खासदार पदासाठी बारामतीतून शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादीतून सुनेत्रा पवार यांची नावे चर्चेत असली तरी […]