श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात पर्यावरण दिनाचा निसर्गमय उत्सव.

Uncategorized

प्रतिनिधी.
निंबूत येथील श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात गुरुवार दि.५ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचा प्रेरणादायी उपक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
या विशेष दिवशी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध फळ- फुलझाडांच्या बियांपासून सीड बॉल तयार केले.
यानंतर विद्यालयात वृक्षारोपण सोहळा पार पडला ज्यात विद्यार्थी पालक श्री. बाळासो पंडित शिंदे व श्री. विटकर शिवदास पांडुरंग यांच्या हस्ते हिरवळ वाढविण्याचा संकल्प करण्यात आला. या पालकांच्या हस्ते विद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.विद्यार्थ्यांनी देखील विविध शोभिवंत रोपे लावून पर्यावरण संवर्धनात आपला मोलाचा वाटा उचलला.
या वेळी इयत्ता १०वी चा विद्यार्थी प्रेमराज प्रमोद भंडलकर याने पर्यावरणाचे महत्त्व, वाढते प्रदूषण आणि वृक्षसंवर्धनाची तातडीची गरज यावर अतिशय प्रभावी शब्दांत आपले मनोगत व्यक्त केले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणारा व ‘एक झाड – एक जीवन’ हा संदेश रुजवणारा ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल नींबूत ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सतीशभैय्या काकडे देशमुख, उपाध्यक्ष मा .सौ. सुप्रिया अश्विनकुमार पाटील व मा.श्री. भिमराव बनसोडे सर, तसेच मानद सचिव मा. श्री. मदनराव काकडे दे. यांनी विद्यालयाच्या या प्रेरणादायी उपक्रमाचे कौतुक करत सर्व उपस्थितांचे अभिनंदन केले.