• Home
  • क्राईम
  • कारागृहातील बंदीवानाचा महिला रक्षकावर प्राणघातक हल्ला
Image

कारागृहातील बंदीवानाचा महिला रक्षकावर प्राणघातक हल्ला

प्रतिनिधी

भंडारा जिल्हा कारागृहातील एका बंदीने कर्तव्यावरील महिला रक्षकावर प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बंदीवानाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिविगाळ करुन त्यानाही जीवानिशी मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकारामुळे कारागृह प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. शाम उर्फ पिटी चाचेरे, वय ३५ असे या हल्लेखोर बंदीवानाचे नाव आहे.

जिल्हा कारागृह वर्ग १ येथे महिला रक्षक ही न्यायाधीन बंदीवानांना व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे मुलाखती घेत असताना न्यायाधीन बंदी शाम उर्फ पिटी चाचेरे याची मुलाखतीची वेळ संपत आली होती. त्यामुळे महिला रक्षकाने त्याला पाच मिनीट शिल्लक राहिले असे बोलले असता आरोपीने कर्तव्यावरील महिला रक्षकासोबत वाद घातला. त्यानंतर त्याची मुलाखतीची वेळ पूर्ण झाल्याने महिला रक्षकाने व्हिडीओ कॉल बंद केला. त्यावर आरोपी बंदीने राग व्यक्त करत कर्तव्यावरील महिला रक्षकाच्या अंगावर धावून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सोबतच त्यांना शिविगाळ करुन हाताला झटका देऊन शासकीय कामात अडथडा निर्माण केला.

तेव्हा महिला रक्षकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना गैरवर्तन केल्याची माहिती दिली. भंडारा पोलीसात गुन्हा दाखल माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी हे मुलाखती कक्षात आले असता आरोपी बंदीवानाने वरिष्ठ अधिकारी संतोष क्षीरसागर आणि गुलाब खरडे यांना तुम्ही मला बोलू देत नाहीत, असे बोलून अश्लील शिविगाळ केली. तसेच गुलाब खरडे यांना टिप्परद्वारे जीवाने ठार मारण्याची देखील धमकी दिली. पोलिसांनी दाखल तक्रारीवरुन आरोपी बंदीवाना विरुद्ध भंडारा पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पवार करीत आहे. जिल्हा कारागृहात या आधीही अशी घटना घडली आहे. काही महिन्यांपूर्वी एका बंदिवानाने आत्महत्या करण्यासाठी झाडावर चढून कारागृह प्रशासनाला वेठीस धरले होते.

Releated Posts

दोन गावठी पिस्तूल, एक रायफलसह आरोपी जेरबंद; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी माळेगाव पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात कारवाई करत दोन गावठी पिस्तूल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन काडतुसांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

रागाच्या भरात नातवाने आजोबांचा लोखंडी गजाने केला खून; आरोपी नातू पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी   शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे शेतातील व घरातील कामे सांगितल्याच्या रागातून २६ वर्षीय नातवाने ८४ वर्षीय…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक- अक्षय थोरात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका…

ByBymnewsmarathi Jun 14, 2026

ऑनलाईन गेमिंगच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; पुणे पोलिसांनी मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश

प्रतिनिधी ऑनलाईन गेम खेळून अल्पावधीत मोठी कमाई करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या सायबर…

ByBymnewsmarathi Jun 13, 2026