Home
नोकरी लागताच पत्नीने केली घटस्फोटाची तयारी; प्रेमविवाहाचा करुण अंत होण्यापूर्वी सावरला संसार
प्रतिनिधी कला, नाट्य, संगीत आणि साहित्य क्षेत्रात काम करीत असताना नागपुरातील तरुणी कोलकाताच्या तरुणाच्या प्रेमात पडली. त्याने प्रेमासाठी आई-वडील, घर सोडून प्रेमविवाह केला आणि पत्नीचे शिक्षण पूर्ण केले. ती नोकरीवर लागताच तिने घटस्फोट देण्याची तयारी केली. मात्र, भरोसा सेलने दोघांचेही समुपदेशन करीत तुटण्याच्या काठावर असलेला संसार वाचविला. देवदत्त आणि रिमा (बदललेले नाव) हे दोघेही कला, […]
आईला मारहाण केल्याच्या राग, मुलाने केली वडिलांची हत्या…
प्रतिनिधी आईला मारहाण केल्याचा राग अनावर झाल्याने मुलाने वडिलांवर लोखंडी बत्त्याने हल्ला चढवून त्यांची हत्या केली. ही धक्कादायक घटना भातकुली ठाण्याच्या हद्दीतील सायत येथे घडली. या प्रकरणी आरोपी मुलास अटक करण्यात आली आहे. राजेश श्रीराम मिसाळ (६०) रा. सायत असे मृत वडिलांचे तर अंकुश राजेश मिसाळ (२९) रा. कोकर्डा असे आरोपी मुलाचे नाव आहे. राजेश […]
नागपुरातील ‘ओयो’त ‘सेक्स रॅकेट’, अल्पवयीन मुली…
प्रतिनिधी शहरातील मोठमोठ्या ‘ओयो’ हॉटेल्समध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याचे उघडकीस आले असून बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णकुंज हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात १५ वर्षांच्या मुलीला देहव्यापार करताना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी हॉटेल मालक राकेश बलवीरसिंह चावला (५५) आणि मुलगा आशिष राकेश चावला (रा. छत्रपती चौक) यांच्यासह पाच आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. बेलतरोडी […]
महामार्गावर लुटमार करणारे तीन सराईत ताब्यात
प्रतिनिधी मुंबई-आग्रा महामार्गावर रात्रीच्या वेळी प्रवासी वाहनांवर कोयत्याने हल्ला करुन लूटमार करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नववर्षाच्या सुरूवातीला मुंबई-आग्रा महामार्गाने मित्रांसमवेत वाहनातून जात असताना मुंढेगाव शिवारात ठाणे येथील किरण कावळे हे काही वेळासाठी थांबले होते. त्यावेळी तीन […]
विनापरवाना औषध विक्री करणाऱ्या औषधाच्या दुकानावर कारवाई; ८५ हजार रुपयांची ९१ प्रकारची औषधे केली जप्त
प्रतिनिधी औषध विक्रीचा परवाना नसतानाही कल्याण भिवंडी रोडवरील आरव आय रुग्णालयाच्या औषध दुकानात बेकायदा औषध विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने ९ फेब्रुवारी रोजी धाड टाकून ८५ हजार ३२५ रुपये किमतीची विविध ९१ प्रकारची औषधे जप्त केली. कल्याण – भिवंडी रोडवरील भिवंडी येथील डॉ. अश्विन बाफना यांच्या मालकीच्या […]
शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंदुरुस्तीचा अभाव, सर्वेक्षणातील निष्कर्ष चिंताजनक
प्रतिनिधी देशातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंदुरुस्ती, उत्तम आरोग्याचा अभाव असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. पाचपैकी दोन मुलांचा शरीर वस्तुमान निर्देशांक (बीएमआय) निरोगी नाही, चारपैकी तीन मुलांमध्ये अपेक्षित एरोबिक क्षमता नाही, पाचपैकी तीन मुलांमध्ये शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागाची ताकदही पुरेशी नसल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणातून दिसून आला. स्पोर्ट्झ व्हिलेज या संस्थेने केलेल्या १२ व्या वार्षिक आरोग्य […]
श्री.बा.सा. काकडे(दे) विद्यालयात २००६-०७ इयत्ता दहावी माजी विद्यार्थी मेळावा संपन्न…*
प्रतिनिधी. निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात सोमवार दि.१२ /०२ /२०२४ रोजी शैक्षणिक वर्ष २००६-०७मधील इ.१०वी च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न झाला . मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आलेल्या मान्यवरांचे स्वागत व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.दिपाली ननावरे यांनी केले .त्यांनी आपल्या प्रास्ताविकात माजी विद्यार्थ्यांच्या कार्याची व […]
जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात एसआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
प्रतिनिधी गडचिरोली येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय शिखरदीप बंगल्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या राज्य राखीव दलाच्या जवानाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. उत्तम किसनराव श्रीरामे (३२) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील रहिवासी आहेत. […]
थायलंडवरून आली १०० फुटांची गौतम बुद्धाची मूर्ती, मात्र दीक्षाभूमीचा स्वीकारण्यास नकार
प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ मध्ये बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्म परिवर्तन केले होते. याच दीक्षाभूमीवर थायलंड देशातून दान करण्यात आलेल्या गौतम बुद्धाची मूर्ती बसविण्यास दीक्षाभूमी स्मारक समितीने नकार दिला आहे. स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी सोमवारी ही माहिती दिली. दीक्षाभूमीवर एकुण चार बुद्धमुर्त्या आहेत. त्यापैकी स्तूपात दोन, वरच्या हॉलमध्ये एक, स्तूपाच्या […]
दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन दरोडेखोरांना बेड्या
प्रतिनिधी सोन्याच्या दुकानावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या तीन दरोडेखोरांना घाटकोपर पोलिसांनी अटक केली. मात्र दोन आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. घाटकोपर पोलिसांकडून शुक्रवारी रात्री परिसरात गस्त सुरू होती. यावेळी परिसरात जवाहिराच्या मोनालीसा ज्वलर्स या दुकानाबाहेर पोलिसांना काहीजण संशयास्पद हालचाली करीत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी यापैकी तिघांना ताब्यात घेतले. मात्र अंधाराचा […]