• Home
  • क्राईम
  • पुण्यातील मटका अड्ड्यावर कारवाई, कारागृहातून बाहेर पडताच पुन्हा मटका अड्डा; सराइतासह साथीदारांविरुद्ध गुन्हा
Image

पुण्यातील मटका अड्ड्यावर कारवाई, कारागृहातून बाहेर पडताच पुन्हा मटका अड्डा; सराइतासह साथीदारांविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी

जुगार, मटका अड्डा चालविण्याचे ६३ गुन्हे दाखल असलेला सराईत नंदू उर्फ नंदकुमार नाईक याच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली होती. गृहविभागाने आठ दिवसांत ही कारवाई रद्द केल्यानंतर नागपूर कारागृहातून बाहेर पडलेला नंदू नाईकने पुन्हा मटका अड्डा सुरू केल्याचे उघडकीस आले. खडक पोलिसांनी मटका अड्ड्यावर कारवाई करून नाईकसह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी नंदू नाईक (वय ७०, रा. शाहू चौक, छत्रपती शिवाजी रस्ता, शुक्रवार पेठ), विजय रंगराव शिंदे (वय ६९, रा. शाहू चौक, छत्रपती शिवाजी रस्ता), शंकर सायअण्णा मॅडम (वय ६५, रा. महात्मा फुले पेठ) यांच्यासह एका अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक आशिष चव्हाण यांनी याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदू नाईक याच्याविरुद्ध मटका, तसेच जुगार अड्डा चालविण्याचे ६३ गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हेगारी वर्तुळात तो ‘मटका किंग’ नावाने ओळखला जातो. त्याच्याविरुद्ध वेळोवेळी पोलिसांनी कारवाई केली होती. त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नव्हती. महापालिकेेने त्याच्या छत्रपती शिवाजी रस्त्यावरील इमारतीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी कारवाई केली होती. त्याच्याविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंजूर केला होता. त्यानंतर १७ मार्च रोजी नाईक याला वर्षभरासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते. नाईक याने ही कारवाई रद्द करण्यासाठी वकिलांमार्फत गृह विभागात प्रयत्न केले. गृह विभागाने ही कारवाई नुकतीच रद्द केली. नाईक कारागृहातून बाहेर पडला आणि त्याने छत्रपती शिवाजी रस्त्यावरील इमारतीत पुन्हा मटका अड्डा सुरू केला. याबाबतची माहिती खडक पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत नाईक याच्यासह साथीदार, तसेच अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मोबाइल संच, मटका खेळण्याच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या. पोलीस हवालदार घोलप तपास करत आहेत.

Releated Posts

​मेढद येथे माळेगाव पोलिसांची मोठी कारवाई; साडेतीन लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

सहसंपादक- अक्षय थोरात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल आणि अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या आदेशानुसार, माळेगाव…

ByBymnewsmarathi Jul 1, 2026

दोन गावठी पिस्तूल, एक रायफलसह आरोपी जेरबंद; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी माळेगाव पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात कारवाई करत दोन गावठी पिस्तूल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन काडतुसांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

रागाच्या भरात नातवाने आजोबांचा लोखंडी गजाने केला खून; आरोपी नातू पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी   शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे शेतातील व घरातील कामे सांगितल्याच्या रागातून २६ वर्षीय नातवाने ८४ वर्षीय…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक- अक्षय थोरात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका…

ByBymnewsmarathi Jun 14, 2026