Home

1 min read

उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी 5 पाईपद्वारे झाला संपर्क 

प्रतिनिधी उत्तरकाशीमध्ये बोगदा कोसळल्यानंतर अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. आत अडकलेल्या ४० मजुरांना बाहेर काढण्यात गुरुवारी रात्री उशिरा मोठे यश मिळाले. बोगद्यात 900 मिमी रुंदीचे आणि 6 मीटर लांबीचे पाच पाईप टाकण्यात आले आहेत, ज्यांच्या मदतीने अडकलेल्या लोकांशी संपर्क साधता येईल. ढिगाऱ्यात काही कठीण पदार्थ असल्यानं ड्रिलिंगची प्रक्रिया तात्पुरती थांबवल्याचं सांगण्यात आलं. […]

1 min read

मुलाखत द्या, नोकरी घ्या! आता खासगी कंपन्यांमध्ये सरकारमार्फत भरती, काही तासांत मिळणार नोकरी

प्रतिनिधी देशासह राज्यातही दिवसेंदिवस उच्चशिक्षित बेरोजगारांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होताना दिसतेय. देश पातळीवर बेरोजगारी मिटवण्याचा प्रयत्न केला जात असताना राज्याच्या धर्तीवरही हेच प्रयत्न सुरु आहेत. महायुती सरकारने यासाठी आता मेगा प्लॅन आखला आहे. खासगी कंपन्यांसाठी मुलाखतीनंतर लगेचच नोकरी देण्याची योजना सरकारने आखली आहे. त्यामुळे राज्यातील तरुण तरुणींना मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. […]

1 min read

दारु पिऊन कुटुंबीयांना शिवीगाळ करणाऱ्या जन्मदात्या बापाची मुलाने केली हत्या

प्रतिनिधी सोलापूर च्या माळशिरस येथील शिंगणापूर नातेपुते येथे सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले आहे. वडील सतत दारू पिऊन कुटुंबीयांना मारहाण करत असल्याच्या त्रासाला कंटाळून मुलानेचे बापाची हत्या केल्याचे उघड झाले आहे. अवघ्या १२ तासात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. मुलगा सुरज सावंत असे आरोपी मुलाचे नाव आहे. तर पांडूरंग […]

1 min read

बारामती ! वडगांव निंबाळकर येथे ऊस तोडणी कामगारांची दिवाळी केली गोड .

प्रतिनिधी – फिरोज भालदार सध्या सर्व साखर कारखान्यांसाठी ऊस तोडणी चालू असून ऊस तोडणी कामगार हे आपले गाव सोडून २०० – ३०० किलो मिटर लांब दुसऱ्या गावी राहून आपली उपजीविका करत असतात . त्यांची दिवाळी देखील गोड व्हावी व ऊस तोडणी कामगारांनी दिवाळीचा सण साजरा करावा यानिमित्त बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बारामती […]

1 min read

माळेगाव येथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संविधानाची विटंबना केल्याप्रकरणी संदीप आढाव याच्यावरती गुन्हा दाखल.

संपादक मधुकर बनसोडे.  माळेगाव पोलीस स्टेशन येथे 6/4/2023 रोजी अंदाजे सकाळी 11 वाजता अज्ञात इसमाने भारताचे संविधान पुस्तिका प्रत माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्या प्रसाधनगृहाच्या दरवाजाच्या पाठीमागे ठेवून त्याचा व्हिडिओ बनवला त्याबद्दल माळेगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक 6:10:2023. रोजी 524/2023 भादवी कलम 295(अ ) सह राष्ट्र गौरवअवमान प्रतिबंध अधिनियम 1971 चे कलम 2 नुसार […]

1 min read

संविधान उद्देशिकाची अवहेलना करणारा खरा गुन्हेगार कोण?

संपादक मधुकर बनसोडे पुणे जिल्ह्यातील माळेगाव पोलीस स्टेशन मध्ये एका अज्ञात इसमाने पोलीस स्टेशनच्या पोलीस प्रभारी अधिकारी यांच्या ऑफिसच्या प्रसाधनगृह याच्या दरवाजाच्या पाठीमागे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला संविधान उद्देशिका याचा अपमान केला असा व्हिडिओ व्हायरल होत असताना संबंधित पोलीस स्टेशन अज्ञात व्यक्ती वरती गुन्हा नोंद केला परंतु जर अज्ञात व्यक्ती पोलीस स्टेशनचे […]

1 min read

बारामती ! मुढाळे ग्रामपंचायत सरपंच जयपाल साळवे व सदस्य अक्षय कदम यांचा वडगांव निंबाळकर मध्ये नागरी सत्कार .

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील मुढाळे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी जयपाल साळवे यांना थेट जनतेतून निवडून सरपंच होण्याचा मान मिळाला असून ते लोकनियुक्त सरपंच झाल्याबद्दल व मुढाळे ग्रामपंचायत सदस्यपदी अक्षय कदम यांची निवड झाल्याबद्दल बारामती तालुका बहुजन हक्क परिषद व वडगाव निंबाळकर ग्रामस्थांकडून त्यांचा नागरिक सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. या कार्यक्रमासाठी […]

1 min read

बारामती ! एम न्यूज मराठीच्या बातमीची दखल घेत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनकडून अवैद्य धंद्यावरती कारवाई .

संपादक – मधुकर बनसोडे एम न्यूज मराठी कडून वडगाव निंबाळकर येथे अवैध धंदे वाल्यांवरती बातमी प्रसारित करण्यात आलेली होती. या बातमीची दखल घेत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांच्याकडून अवैध धंदे वाल्यांवरती कारवाई करण्यात आली आहे . दिनांक १०/ ११ / २०२३ रोजी दुपारी ३.४५ वा. चे सुमारास वडगाव निंबाळकर ता. बारमती गावचे हद्दीत उमाजी नाईक […]

1 min read

सिकंदर शेख याच्याकडे मानाची महाराष्ट्र केसरीची गदा, गतविजेता शिवराज राक्षेला दाखवलं अस्मान

प्रतिनिधी महाराष्ट्र केसरी 2023-24 च्या फायनलमध्ये वाशिमच्या सिकंदर शेख याने गतविजेता शिवराज राक्षेला वीस सेकंदाच्या चीत करत मैदान मारलं. बलदंड शरीर यष्टीच्या शिवराजला अवघ्या दहा सेकंदामध्ये त्याने अस्मान दाखवत 66 वा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला. मागील वर्षी हुकलेली संधी सिकंदरच्या डोक्यात होती. अवघ्या महाराष्ट्राने महेंद्र गायकवाड याच्याकडून झालेला पराभव पाहिला होता. पण गडी खचला नाही […]

1 min read

श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने १३ नोव्हेंबर रोजी वाहतुकीत बदल

प्रतिनिधि पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे १३ नोव्हेंबर रोजी श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत. वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून १३ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत पुणे ते […]