संपादक मधुकर बनसोडे
पुणे जिल्ह्यातील माळेगाव पोलीस स्टेशन मध्ये एका अज्ञात इसमाने पोलीस स्टेशनच्या पोलीस प्रभारी अधिकारी यांच्या ऑफिसच्या प्रसाधनगृह याच्या दरवाजाच्या पाठीमागे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला संविधान उद्देशिका याचा अपमान केला असा व्हिडिओ व्हायरल होत असताना संबंधित पोलीस स्टेशन अज्ञात व्यक्ती वरती गुन्हा नोंद केला परंतु जर अज्ञात व्यक्ती पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्या प्रसाधनगृहामध्ये पोहोचत असेल तर सामान्य नागरिकांनी काय समजावे? यावरून सामान्य नागरिक यांच्यावर संभ्रम निर्माण होतो की पोलीस प्रशासन व्यवस्थित पोलीस ठाण्यामध्ये सामान्य नागरिकांना आत येऊन देत नाहीत तर हा अज्ञात इसम पोलीस स्टेशनच्या प्रभारी ऑफिसच्या प्रसाधनगृह इथपर्यंत पोहोचतो कसा?
यावरून असे निदर्शनास येते की खरा गुन्हेगार कोण? संबंधित घटनेमध्ये सर्वात मोठा गुन्हेगार हा पोलीस प्रशासनच आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही का? कारण जर अग्यात व्यक्ती हा पोलीस स्टेशनच्या पोलीस प्रभागाच्या ऑफिसमध्ये जाऊन तेथे भारत देशाची मान असलेला संविधान याची उद्देशिका व संविधान निर्माण करण्याचा ज्या महापुरुषाचा सर्वात मोठा हात आहे त्या महापुरुषाचा फोटो त्या उद्देशिकांमध्ये असून या उद्देशाची विटंबना करणे हे पोलीस प्रशासनाच्या माथेवरती कलंक आहे कारण पोलीस प्रशासन हे कायदा व सुव्यवस्था समाजामध्ये व्यवस्थित आणि शांततापूर्ण राहावे यासाठी काम करते परंतु कायदा व सुव्यवस्था याचा उल्लेख असणारा संविधान व या संविधानाची रचना करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना जर पोलीस स्टेशनमध्ये होत असेल तर अज्ञात इसमा बरोबर पोलीस प्रशासनही खरे गुन्हेगार आहेत?
याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांची देखील चौकशी झाली पाहिजे का अशी देखील नागरिकांमधून चर्चा होत आहे ?