Home
सौदामिनी महिला बचत गट खंडोबाची वाडी यांचा दिवाळी बाजार वाटप करीत अनोखा उपक्रम.
प्रतिनिधी. सौदामिनी महिला बचत गट खंडोबाची वाडी मार्फत दिवाळी निमित्ताने महिला बचत गटातील महिलांन दिवाळी सणाचा बाजार वाटप करण्यात आला , यामध्ये महिलांना 1 जेमिनी सूर्यफूल तेल डबा, पाच किलो डाळ, दोन किलो खोबरे , तीन किलो रवा, तीन किलो मैदा अशा वस्तूचे वाटप करण्यात आले. सौदामिनी महिला बचत गटास जवळपास 12 ते 13 वर्ष […]
मराठी भाषा विद्यापीठ पुढील वर्षी जूनपासून सुरू करण्याचे नियोजन -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
प्रतिनिधी रिद्धपूर (जि.अमरावती) येथील मराठी भाषा विद्यापीठासाठी विधिमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मंजूर करून पुढील वर्षीच्या जूनपासून मराठी भाषा विद्यापीठ सुरू करण्याचे नियोजन करण्यात येईल, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. रिद्धपूर (जि.अमरावती) येथील मराठी भाषा […]
कुणबी नोंदी शोधण्यासाठी गठीत जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न
प्रतिनिधी जिल्ह्यातील कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर करावे-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक पुरावे शोधण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली. जिल्ह्यातील कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात […]
बारामती ! वडगाव निंबाळकर येथे अवैद्यरित्या व्यवसायांना जोर ; पोलिस प्रशासनाचे मात्र डोळ्यावर हात का ?.
प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर या ठिकाणी मटका, ऑनलाईन, चक्री , मुरूम वाहतूक यासारख्या अवैध धंद्यांना जोर असून ग्रामस्थ या धंद्यांवरती संताप्त व्यक्त करीत आहेत . वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरती याप्रकारचे अनेक अवैद्य धंदे चालू असून या ठिकाणी प्रशासन या अवैध धंद्यांवरती कारवाई का करत नाही? हे अवैध धंदे दिवस […]
युनिट मुख्यालय कोटा अंतर्गत जबलपूर येथे अग्नीवीर आर्मी भरती मेळाव्याचे आयोजन
प्रतिनिधी युनिट मुख्यालय कोटा अंतर्गत १ सिग्नल प्रशिक्षण केंद्र, जबलपूर येथे ७ ते १० नोव्हेंबर या कालावधीत अग्नीवीर आर्मी भरतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे. आयोजित करण्यात आलेला अग्नीवीर भरती मेळावा हा माजी सैनिकांच्या पाल्यासाठी असून जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या पाल्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन लेफ्टिनंट कर्नल हंगे […]
बारामती विधानसभा मतदार संघातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न
प्रतिनिधी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा मतदार संघातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. उपविभागीय अधिकारी श्री. नावडकर म्हणाले, निवडणूकीच्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय प्रमुखांची क्षेत्रीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांना करावयाच्या कामांबाबत […]
प्रसन्न पेट्रोलियम फरांदेनगर येथे सीएनजी सेवा सुरू.
अनेक वाहन मालकांच्या सेवेसाठी प्रसन्न पेट्रोलियम निंबुत फरांदेनगर येथे सीएनजी सेवा आजपासून दिनांक ०३/११/२०२३ पासुन सुरू झाली असून सीएनजी सेवेचे उद्घाटन श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माजी संचालिका श्रीमती सुमनताई फरांदे व श्री. दिलीपदादा फरांदे संस्थापक अध्यक्ष समता पतसंस्था व माजी व्हा. चेअरमन श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या मातोश्री श्रीमती शकुंतला प्रभाकर फरांदे यांच्या […]
केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी ३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
प्रतिनिधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत फळ पीक विमा योजनेत केळी पिकाचा विमा भरुन योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना ३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे कृषी विभागाने कळविले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत अंतर्गत हवामान आधारित फळ पिक विमा योजनेमध्ये आंबिया बहार २०२३-२४ साठी केळी पिकाचा विमा भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२३ ही होती. ३१ ऑक्टोबर […]
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन
प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. मात्र राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आले. तसेच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते श्री. […]
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर […]