प्रतिनिधी.
निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय व ज्युबिलंट भारतीया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. ५जाने. २०२५रोजी विद्यालयात आनंद बाजार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या आनंद मेळाव्याचे उद्घाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.दिपाली ननावरे व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.ज्योतीताई लकडे व उपस्थित महिला यांच्या हस्ते झाले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यांनी हा आनंद बाजार मेळावा आयोजित करण्या पाठीमागचा उद्देश व भूमिका आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केली. तसेच आपण विकत असणाऱ्या पदार्थांचा ताळेबंद म्हणजेच खर्च विक्री व झालेला नफा याचा अहवाल मेळावा संपल्यानंतर लिहून पूर्ण करण्याचे आवाहन केले.
या आनंद बाजार मेळाव्यात परिसरात पिकणारा भाजीपाला त्याचबरोबर वेगवेगळे खाऊचे पदार्थ यात वडापाव,मिसळ,मंचुरियन,इडली- सांबर,उत्तप्पा, ऊसाचा रस,आईस्क्रीम, पोहे,चहा, कांदा-भजी असे स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले होते.
या स्टॉलला विद्यार्थ्यांचे पालक त्याचप्रमाणे गावतील ग्रामस्थ, विद्यालयातील विद्यार्थी, सर्व शिक्षक मुख्याध्यापिका यांनी भेटी देऊन मनसोक्त खरेदी केली व खाऊ गल्लीतील पदार्थांचा आस्वाद घेतला.
विद्यालयाने आयोजित केलेल्या या आनंद बाजार मेळाव्याच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पदार्थ तयार करणे,त्यासाठी लागणारा खर्च व विक्रीतून होणारा नफा याचे ज्ञान चांगल्या प्रकारे मिळाले व उपक्रम घेण्या पाठीमागचा उद्देश खऱ्या अर्थाने सफल झाला.
आयोजित केलेल्या या आनंद बाजार मेळाव्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.सतीशभैय्या काकडे दे.उपाध्यक्ष मा.श्री.भीमराव बनसोडे व मानद सचिव मा.श्री.मदनराव काकडे दे.यांनी शुभेच्छा दिल्या व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
