Home
प्रा.डॉ.प्रवीण ताटे देशमुख यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार
सोमेश्वरनगर – येथील मुगुटराव साहेवराव काकडे महाविद्यालयातील उपप्राचार्य डाॅ. प्रवीण ताटे देशमुख यांची हिंगोली येथील समृद्धी प्रकाशनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील ‘ स्व.मारोतराव कऱ्हाळे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 ‘ साठी निवड झाल्याचे पत्र पुरस्काराचे संयोजक प्रा.डॉ. श्रीराम कऱ्हाळे यांनी दिले आहे. पुरस्काराचे वितरण ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. डॉ.ताटे देशमुख हे महाविद्यालयात गेली १४ […]
जालना जिल्ह्यातील लाठीमार ” बारामती तालुक्यात तीव्र पडसाद प्रशासनाविरोधात निषेध मोर्चे ,सभा व गाव बंद.
प्रतिनिधी – फिरोज भालदार जालना जिल्ह्यातील अंरतवली सराटी या गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला होता. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटले असतानाच बारामती शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी याचे तीव्र पडसाद पडल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील […]
सोमेश्वराच्या चरणी हजारो भाविक तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त नतमस्तक.
संपादक मधुकर बनसोडे. श्रावण महिन्यातला आज तिसरा सोमवार असून श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे आज जवळपास 50 ते 60 हजार भाविकांनी सोमेश्वराचे दर्शन घेतले रात्री बारा वाजल्यापासूनच दर्शनाच्या रांगा सुरू झाल्या होत्या. सोमेश्वराच्या दर्शनासाठी राज्यातूनच नव्हे तर परराज्यातून देखील भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. रात्री बारा वाजता आरती झाल्यानंतर दर्शनाच्या रांगा सुरू करण्यात आल्या पूर्ण […]
पोलीस पाटील भरती प्रकियेचे वेळापत्रक जाहीर इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे उप विभागीय दंडाधिकाऱ्यांचे आवाहन*
प्रतिनिधी. बारामती, दि.४: बारामती व इंदापूर तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील या पदासाठी भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून यासाठी पात्र उमेदवारांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय, प्रशासकीय भवन, दुसरा मजला, इंदापूर रोड, बारामती येथे २० सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कऱण्यात येत आहे. उमेदवारांना अर्जाचे वाटप व स्वीकारण्याचा कालावधी ७ ते २० सप्टेंबर (कार्यालयीन […]
आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं या घोषणा देत सोमेश्वर नगर येथे निषेध व्यक्त करून पाळला कडकडीत बंद.
संपादक मधुकर बनसोडे. जालना जिल्ह्यातील सराटी येथील मराठा आंदोलकांवरती झालेल्या लाठी चार्जचा निषेधार्थ बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर येथे बारामती बंद च्या पार्श्वभूमी वरती सोमेश्वर नगर येथे निषेध व्यक्त करीत कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी सोमेश्वर कारखाना येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून निरा बारामती रोड येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. […]
निरा, निंबुत येथील जुबीलंट इनग्रेव्हिया कंपनी मध्ये झालेल्या स्फोटा मधील कामगार खरंच सुरक्षित आहेत का?
संपादक मधुकर बनसोडे. दिनांक 2 सप्टेंबर वेळ अंदाजे दुपारी बारा वाजता कंपनी मधील एका प्लांटमध्ये वेल्डिंग चे काम चालू असताना जुबिलंट कंपनीमध्ये स्पोर्ट झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरू लागली. त्यामध्ये अनेक माध्यमाने सांगितले की जवळपास चार कामगार या स्फोटामध्ये जखमी झाले आहेत तर कंपनी प्रशासनाकडून तीन कामगार जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. नक्की किती कामगार या […]
वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष “बारामती तालुका उपसमन्वयक” पदी श्री.सुशीलकुमार अडागळे यांची निवड.
राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री एकनाथ शिंदे, मा. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, तसेच मंगेश नरसिंह चिवटे, मूळ संकल्पना तथा माजी कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष, तथा विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय.यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या “बारामती तालुका उपसमन्वयक” या पदासाठी श्री.सुशीलकुमार विलास अडागळे, वडगांव निंबाळकर यांची निवड करण्यात आली. दिनांक २/९/२०२३ […]
यूईआय ग्लोबल एज्युकेशन तर्फे गोवा फूड फेस्टिव्हल चे आयोजन.
प्रतिनिधी शिवाजी नगर पुणे येथील हॉटेल मॅनेजमेंट चे शिक्षण देणार्या यूईआय ग्लोबल एज्युकेशन तर्फे आज पुण्यात गोवा फूड फेस्टिव्हल ( खाद्य महोत्सव) चे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये गोवा राज्यातील शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचा समावेश करण्यात आला होता. यूइआय ग्लोबल एज्युकेशन च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी *फिशरमॅन्स व्हार्फ – गोवा फन अनलिमिटेड* या गोवन […]
जुबलंट कंपनी निरा निंबुत येथे स्पोट? अनेक कामगार जखमी झाल्याचीचर्चा?
प्रतिनिधी. निरा येथे केमिकल कंपनी मध्ये नवीन प्रकल्पामध्ये काम करत असताना अंदाजे बारा वाजता स्पोट होऊन कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. कंपनी प्रशासनाकडून जखमींना लोणंद येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी पाठवल्याचे देखील समजत आहे. सदर घटनेमुळे निरा निंबूत व परिसरामधील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. नक्कीच स्पोट कशाचा होता? याबाबत कंपनी प्रशासनाकडून खुलासा […]
तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत सोमेश्वर विद्यालय आंबीचे यश
मोरगाव – प्रतिनिधी बारामती येथे पार पडलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयाच्या शुभम विकास जाधव याने ८० किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला. बारामती तालुक्याच्या शालेय कुस्ती स्पर्धा बारामती येथील कुस्तीगीर संघात पार पडल्या. यावेळी शुभम जाधव याने ८० किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला. […]