• Home
  • क्राईम
  • मध्यभागात बनावट नोटांचा मोठा साठा जप्त; गुजरातमधील तरुण गजाआड; पाेलिसांकडून सखोल तपास सुरू
Image

मध्यभागात बनावट नोटांचा मोठा साठा जप्त; गुजरातमधील तरुण गजाआड; पाेलिसांकडून सखोल तपास सुरू

प्रतिनिधी

बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्नात असलेल्या गुजरातमधील तरुणाला समर्थ पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून ५०० रुपयांच्या १४२ आणि शंभर रुपयांच्या ६१ अशा ७७ हजार रुपयांच्या बनावट आणि हुबेहूब दिसणाऱ्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. बनावट नोटा बाळगणाऱ्या तरुणाची पाेलिसांकडून चौकशी सुरू आहे.

गौरव रामप्रताप सविता (वय २४, रा. जामनगर, गुजरात) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई लखन शेटे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, समर्थ पोलिसांचे पथकांकडून शुक्रवारी रात्री सराइतांची तपासणी (कोम्बिंग ऑपरेशन) करण्यात येत होती. वरिष्ठ निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पथक सोमवार पेठ, रास्ता पेठेतील लाॅजची तपासणी करत होती. त्यावेळी एक जण रास्ता पेठेतील उंटाड्या मारुती मंदिराजवळ थांबला असून, त्याच्याकडे बनावट नोटा असल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांचे पथक तेथे गेले. पोलिसांना पाहताच आरोपी गौरव तेथून पसार होण्याच्या तयारीत होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. समर्थ पोलीस ठाण्यात गौरवला नेण्यात आले.

त्याची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे पाचशे रुपयांच्या १४२ आणि शंभर रुपयांच्या ६१ अशा ७७ हजार २०० रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी त्याला अटक केली असून, त्याने बनावट नोटा कोणाकडून आणल्या यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मेघराज जाधव तपास करत आहेत.

Releated Posts

दोन गावठी पिस्तूल, एक रायफलसह आरोपी जेरबंद; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी माळेगाव पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात कारवाई करत दोन गावठी पिस्तूल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन काडतुसांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

रागाच्या भरात नातवाने आजोबांचा लोखंडी गजाने केला खून; आरोपी नातू पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी   शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे शेतातील व घरातील कामे सांगितल्याच्या रागातून २६ वर्षीय नातवाने ८४ वर्षीय…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक- अक्षय थोरात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका…

ByBymnewsmarathi Jun 14, 2026

ऑनलाईन गेमिंगच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; पुणे पोलिसांनी मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश

प्रतिनिधी ऑनलाईन गेम खेळून अल्पावधीत मोठी कमाई करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या सायबर…

ByBymnewsmarathi Jun 13, 2026