Home
सामाजिक बांधिलकी जपत न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी च्या विद्यार्थ्यांनी साजरे केले रक्षाबंधन.
प्रतिनिधी. न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी व भाग शाळा मुरूम येथील गाईडच्या विद्यार्थिनींनी उत्कर्ष आश्रम शाळा वाघळवाडी येथील विद्यार्थ्यांना व करंजेपूल पोलीस स्टेशन येथील पोलीस बांधवांना राखी बांधत सामाजिक बांधिलकी जपली. अशी आगळी वेगळी राखी पौर्णिमा साजरी करत असताना मुलींनी 125 मुलांना राख्या बांधल्या तर छोट्या भावांनी पेन, वही यासारखी गिफ्ट सुद्धा दिली. गाईड कॅप्टन प्राजक्ता […]
बारामती ! सुपा पोलिसांची दमदार कामगिरी ; अवैधरित्या विनापरवाना वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्यांना सुपा पोलिसांनी केले जेरबंद .
प्रतिनिधी – फिरोज भालदार दि. ३०/०८/२०२३ रोजी पहाटे ३ वा. चे सुमारास सुपा पोलीस स्टेशन हददीतील मौजे काराटी गावचे हददीत करहा नदी पात्रामध्ये अवैदय रित्या वाळू उपसा चालु असलेबाबत गोपनीय माहीती प्राप्त झालेने सुपा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नागनाथ पाटील , राहुल भाग्यवंत , पो. अंमलदार सचिन दरेकर, होमगार्ड धायगुडे असे मिळुन खाजगी वाहनाने रवाना […]
लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण पुणे जिल्हा ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित*
प्रतिनिधी. पुणे, दि. ३०: जिल्ह्यातील शिरूर, दौंड, खेड, आंबेगाव, हवेली व मुळशी तालुक्यातील काही गोवर्गीय जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्यादृष्टीने संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संपूर्ण पुणे जिल्हा लम्पी चर्म रोगासाठी ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित केल्याचे आदेश जारी केले आहेत. काही […]
साहेबराव दादा विकास सोसायटीची 112 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.
प्रतिनिधी. 1911 साली स्थापन झालेल्या साहेबराव दादा विकास कार्यकारी सोसायटीची आज 112 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या आनंदाने बाबा कमल सभागृह निंबुत येथे पार पडली. शेतकऱ्यांना सावकाराच्या दारामध्ये कर्जासाठी जाऊ लागू नये यासाठी व शेतकऱ्याला आधार देण्यासाठी या संस्थेची स्थापना साहेबराव दादा काकडे देशमुख यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. या संस्थेच्या माध्यमातून. शेतकऱ्यांना पीक कर्ज, […]
मु.सा.काकडे महाविद्यालयास बारामती तालुका शालेय कुस्ती स्पर्धेत विजेतेपद
प्रतिनिधी सोमेश्वरनगर – सोमेश्वरनगर येथील मु.सा.काकडे महाविद्यालयास बारामती तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त झाले.यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.सतीश भैय्या काकडे- देशमुख.महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत भैय्या काकडे- देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.देविदास वायदंडे,* *संस्थेचे सचिव सतीश लकडे, उपप्राचर्य प्रा.रविंद्र जगताप, पर्यवेक्षिका प्रा.जयश्री सणस, प्रा.सुजाता काकडे व्यवस्थापन समिती सदस्य यांनी […]
पुणे विभाग माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्था सातारा या संस्थेच्या सल्लागारपदी बारामती मधून श्री.अविनाश सावंत यांची तर पुरंदर मधून श्री.शिवाजीराव काकडे देशमुख यांची निवड…
प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर व कोल्हापूर तसेच कोकण विभागातील रायगड जिल्हा असे सहा जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या, पुणे विभाग माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्थेच्या सल्लागारपदी बारामती तालुक्यातील धों.आ.सातव (कारभारी) हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे कार्यरत असलेले , बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्ष श्री.अविनाश सावंत सर यांची तर पुरंदर तालुक्यामधून श्री बा.सा.काकडे -देशमुख […]
योध्दा प्रोडक्शनच्या वर्धापन दिनानिमित्त श्रीकांत आव्हाड यांनी केले 200 व्यवसायिकांना मार्गदर्शन…
( प्रतिनिधी) बारामती – बारामती मधील योद्धा प्रोडक्शन अँड पब्लिसिटी च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त दौंड, इंदापूर, बारामती, फलटण व परिसरातील व्यावसायिक /उद्योजक मित्रांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्रीकांत आव्हाड उद्योजक मित्र अहमदनगर, तर प्रमुख उपस्थिती उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती श्री गणेश इंगळे हे होते. बारामती आणि परिसरातील सर्व व्यावसायिकांना नवीन […]
सोमेश्वर विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
– प्रतिनिधी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस व राष्ट्रीय क्रीडा दिन आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक संतोष जेधे यांनी शालेय जीवनात खेळांचे महत्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कबड्डी, खो खो, उंच उडी, गोळाफेक, बॅडमिंटन, टेनिक्वाईट असे मैदानी खेळ तर बुद्धिबळ, कॅरम असे इनडोअर खेळ […]
प्रत्येक महाविद्यालयातून उद्योजक तयार होणे ही काळाची गरज: मा. दीपक सोनटक्के यांचे प्रतिपादन!
प्रतिनिधी (दि. २९.०८.२०२३) सध्याचे युग हे उद्योग आणि उद्योजकांचे असून प्रत्येक महाविद्यालयातून उद्योजक तयार होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन ऑर्गानिसिस नीरा जुबिलन्ट येथील मनुष्यबळ विभागाचे प्रमुख माननीय दीपक सोनटक्के यांनी केले. ते मु.सा. काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर येथील वाणिज्य विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता सुधार कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “आजच्या युगात उद्योजकाचे महत्व” या विषयावरील […]
बारामती ! डुब्लीकेट आकड्याच्या चिट्ट्या देऊन पुना मटका नावाणी चालवणाऱ्या दोन व्यक्तींवरती बारामती शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल .
प्रतिनीधी – फिरोज भालदार दि. २८/८/२०२३ रोजी बारामती शहरातील पानगल्ली येथे नामे ऋषिकेश लक्ष्मण डिकळे रा. प्रबुद्धनगर इंदापूर रोड बारामती व गणेश भारत पवार रा. ढोरगल्ली बारामती ता. बारामती जि. पुणे हे दोन्ही व्यक्ती पुना मटका नावाचा जुगार आपल्या ओळखीच्या लोकांकडून पैसे घेऊन त्या बदल्यात त्यांना or पुना मटका जुगारीच्या डूब्लिकेट आकड्याच्या चिट्ट्या देऊन पुना […]