Home

1 min read

शिरुर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

प्रतिनिधी  महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह शिरुर या संस्थेत 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक मुलींनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन शिरुर येथील वसतिगृहाच्या गृहपाल श्रीमती आर.व्ही. साखरे यांनी केले आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय, विशेष […]

1 min read

येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांसाठी ‘तणावमुक्ती’ बाबत व्याख्यानाचे आयोजन

प्रतिनिधी अपर पोलीस महासंचालक व राज्याचे कारागृह व सुधार सेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून व पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली स्ट्रेस रिलीज फाऊंडेशनच्या वतीने येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांच्या ‘तणावमुक्ती’ करीता व्याख्यानाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. कार्यक्रमास अपर पोलीस महासंचालक श्री. गुप्ता, कारागृह उपमहानिरीक्षक श्रीमती साठे, कारागृह अधीक्षक राणी भोसले, कारागृह उपअधीक्षक […]

1 min read

शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी करावे- वैभव नावडकर

प्रतिनिधी  बारामती तालुक्यातील सर्व शासकीय विभागांनी समन्वयातून ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे नियोजन करून यशस्वीरित्या अंमलबजावणी करावी, अशा सूचना उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिल्या. ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी तहसिल कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसिलदार गणेश शिंदे, तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, सहायक गट […]

1 min read

१ हजार ९२६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता पाच वर्षांतील मेट्रो प्रकल्पासाठी च्या वाढीव अतिरिक्त विकास शुल्क माफ: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

प्रतिनिधी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राधिकरणाच्या या वर्षांच्या १ हजार ९२६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता यावेळी देण्यात आली. जुलै २०१८ ते एप्रिल २०२३ या पाच वर्षांच्या काळातील प्राधिकरणाकडून विकास आणि बांधकाम प्रकरणांमध्ये वसुल करण्यात येणारे १०० टक्के अतिरिक्त विकास शुल्क माफ करण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ […]

1 min read

कुटुंब सावरणारी ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’

प्रतिनिधी शेती व्यवसाय करत असताना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्ते, वाहन अपघात आदी कारणामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबियास आर्थिक लाभ देण्यासाठी ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी राबविण्यात येत असलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांचे विमा दावे वेळेत मंजूर न […]

1 min read

बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिला अटक

प्रतिनिधी सध्या महिलांना एसटी बस भाड्यामध्ये 50 टक्के आरक्षण झाल्यामुळे बहुसंख्य महिला ह्या एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करत आहेत त्यामुळे महिलांची गर्दी दिवसेंदिवस बस मध्ये वाढलेली आहे ह्या गर्दीचा फायदा घेऊन काही संशयित महिला या महिलांच्या दागिन्यावर हात साफ करत असतात विशेष करून बसमध्ये चढताना एखाद्या महिलेला संशयित महिला ह्या घेरतात धक्काबुक्की मध्ये हळूचपणे गळ्यातील […]

1 min read

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समिती बैठक संपन्न

प्रतिनिधी व्यवसायाच्या फायद्यासाठी दुभाजक तोडल्याचे आढळल्यास कठोर कारवाई- जिल्हाधिकारी पुणे- बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर कात्रज नवीन बोगदा ते नवले पूलदरम्यान अपघातांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीच्यावतीने सुचविलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज घेतला. दरम्यान रस्त्याच्या बाजूच्या व्यावसायिकांनी सेवारस्ता आणि मुख्य मार्गिका यामधील दुभाजक (डिव्हायडर) तोडल्याचे आढळून आल्यास संबंधिताचा व्यवसाय परवाना रद्द करण्यासह […]

1 min read

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बाणेर-बालेवाडी २४x७ पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण

प्रतिनिधी पुण्याच्या सुनियोजित आणि गतीमान विकासावर भर देणार-उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेतर्फे शहरासाठी करण्यात आलेल्या सुस-म्हाळुंगे पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आणि २४x७ समान पाणीपुरवठा प्रकल्पाअंतर्गत वारजे जलशुद्धीकरण केंद्र ते बाणेर-बालेवाडी येथील मुख्य दाब नलिकांचे व पाण्याच्या टाक्यांचे लोकार्पण करण्यात आले. पुणे शहराच्या सुनियोजित आणि गतीमान विकासावर भर देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी […]

1 min read

अकोला, शेवगाव दंगलीतील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

प्रतिनिधी सामाजिक सलोखा राखण्याचे मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलींना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सामाजिक सलोखा राखला जाईल, कुणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी घेऊन सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलींनंतर या  दोन्ही ठिकाणी […]

1 min read

श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी ५००० विशेष बसेस सोडणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रतिनिधी   आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरयात्रेकरिता वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. दि. २५ जुन ते ०५ जुलै या दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी (२७ जुन रोजी) २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पंढरपूर आषाढी यात्रेसाठी […]