संपादक मधुकर बनसोडे.
विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या बारामती तालुक्यातील एका महाविद्यालयातील बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्याच्याच वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्याने कोयत्याने वार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी बारामतीत घडला.या प्रकारामुळे बारामती शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घडलेल्या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .दोघांमध्ये पार्किंगला गाडी लावण्यावरून काही दिवसांआधी भांडण झाल्याची चर्चा विद्यार्थ्यांमधून होत आहे . या रागातूनच हा खून झाल्याची माहिती समजत आहे.
अद्याप मारेकरी विद्यार्थ्याची आणि मृत विद्यार्थ्यांची ओळख पटली नाही. मृत विद्यार्थ्यांचा मृतदेह हा बारामतीतील शासकीय रुग्णालयात आणण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे महाविद्यालयाच्या मुख्य आवारात धारदार शस्त्राने असंख्य विद्यार्थी उपस्थित असताना थेट कोयत्याने वार करून विद्यार्थ्यांचा खून करण्यात आला आहे. त्या धारदार शस्त्राचा घाव एवढा वर्मी होता की, ते धारदार शस्त्र विद्यार्थ्यांच्या नरड्यात अडकला होता. अशी चर्चा विद्यार्थ्यांमधून होत आहे याचवेळी एका विद्यार्थिनीलाही दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दरम्यान,बारामतीमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये आता मोठ्या प्रमणाता वाढ होताना दिसत आहे. पुणे शहारानंतर आता ग्रामीण भागातही कोयत्याचं लोन महाराष्ट्रभर पसरताना दिसत आहे. विद्यार्थ्याने महाविद्यालयामध्येच हत्या केल्याने बारामती सारख्या शांतता प्रिय शहरात अशा घटना घडत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.