Home
जागरुक पालक व सुदृढ बालक अभियानाचे डोर्लेवाडी येथे आयोजन
प्रतिनिधी बारामती दि. ९ : पुणे जिल्हा परिषद, बारामती पंचायत समिती आणि प्राथमिक आरोग्य केंद्र डोर्लेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुकास्तरीय ‘जागरुक पालक व सुदृढ बालक’ अभियानाचे डोर्लेवाडी येथे आयोजन करण्यात आले. या अभियानाचा शुभारंभ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्र डोर्लेवाडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापू दडस, डॉ. वैशाली […]
तालुका रोपवाटिकेत फळपिकाची कलमे विक्रीसाठी उपलब्ध*
प्रतिनिधी बारामती दि. ९ : कन्हेरी येथील तालुका रोपवाटिकेत विविध प्रकारच्या फळपिकाची कलमे शासकीय दराने विक्रीसाठी उपलब्ध आहेत, अशी माहिती उप विभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी दिली आहे. रोपवाटिकेच्या प्रक्षेत्रावर आंबा फळपिकाच्या केशर, हापूस, वनराज, तोतापुरी, चौसा, क्रोटॉन, सुवर्णा, पुसा अरुनिमा, दूधपेढा, रत्ना, मलिका, नीलम, गोवा मानकूर, टॉम अँटकिंग, केंट सिंग्टन, डाळिंब फळपिकाचे भगवा […]
मातृभाषा, संस्कार, नितीमूल्यांच्या आधारे देशाची प्रगती- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
प्रतिनिधी पुणे, दि. ९: मातृभाषा, संस्कार आणि नितीमूल्यांच्या आधारे उद्दिष्ट निश्चित करीत दूरदृष्टीने कार्य केल्यास देश प्रगती करेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते सिम्बायोसिस विश्वभवन येथे क्यूएस रेटिंग सिस्टमचे सीईओ डॉ. अश्विन फर्नांडिस लिखित ‘इंडियाज नॉलेज सुप्रीमसी : द न्यू डॉउन’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते […]
मुंबईत चर्चगेट येथील आझाद मैदानात 11 ते 19 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2023 चे आयोजन
प्रतिनिधी नऊ दिवसीय सांस्कृतिक सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते होणार. भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने मुंबईत चर्चगेट येथील आझाद मैदानात 11 ते 19 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2023 आयोजित केला आहे. हा महोत्सव भारताचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करण्याची संधी आहे. सांस्कृतिक देवाणघेवाणीद्वारे राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मतेला प्रोत्साहन देणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट […]
कृषी विज्ञान केंद्राला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट, शेतीमध्ये सर्वाधिक उद्योग निर्मितीची क्षमता- मंत्री सुधीर मुनगंटीवार
प्रतिनिधी बारामती दि. ८ : बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रासह विविध उपक्रमांना वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली. सर्वात जास्त उद्योग निर्माण करण्याची क्षमता शेतीमध्ये आहे, असे ते यावेळी म्हणाले. यावेळी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, परीविक्षाधीन-तहसिलदार नेहा शिंदे, उप विभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे […]
अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून ; 9 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार
प्रतिनिधी मुंबई, दि. 8 : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 27 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन 2023-24 चा अर्थसंकल्प गुरुवार, 9 मार्च रोजी सादर केला जाणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा कामकाज […]
डिजिटल मीडिया व प्रिंट मीडिया त्याचे विभाग हे वेगळे आहेत!
संपादक- मधुकर बनसोडे बारामती -: डिजिटल मीडियाचे पत्रकार हे इंटरनेट द्वारे वेब पोर्टल काढून डिजिटल मीडिया पत्रकारिता माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या 2021 च्या गाईडलाईनुसार पालन करून पत्रकारिता करत आहेत. तसेच प्रिंट मीडिया ह्या हे RNI रजिस्टर असल्यामुळे साप्ताहिक असल्यास आठवड्यातून एकदा आपले साप्ताहिक प्रिंट करून वाटावे लागतात. त्याची पीडीएफ करून किंवा ब्यानर बनवून व्हाट्सअप द्वारे […]
यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारांच्या नियमावलीत सुधारणा
प्रतिनिधी मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२२ करीता राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेसाठीच्या प्रवेशिका पाठविण्यास २ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच या स्पर्धेच्या नियमावलीतील नियम क्रमांक २४ मध्ये बदल करण्यात आला असून या नियमात ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावरील शासन नियुक्त सदस्य […]
डिजिटल मीडियाच्या पत्रकारानी एक संघ पत्रकार व एकजूट पत्रकार म्हणुन रहाणे काळाची गरज आहे का?
संपादक- मधुकर बनसोडे बारामती -: आपल्या भारत देशामध्ये असंख्य डिजिटल मीडियाचे पत्रकार आहेत. माहिती व प्रसारण मंडळाने 2021 च्या गाईडलाईनुसार हे डिजिटल मीडियाचे पत्रकार वेब पोर्टल इंटरनेटच्या माध्यमातून पत्रकारिता करत आहेत. परंतु खऱ्या अर्थाने हे डिजिटल मीडियाचे पत्रकार एकजुटीने व एक संघ आहेत का? डिजिटल मीडियाचे पत्रकार हे नेहमी नागरिकांचे प्रश्न घेऊन आपल्या लेखणीतून न्याय […]
निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन छत्रछायेत आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ४८ जोडपी विवाहबद्ध
प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड- महाराष्ट्राच्या ५६व्या निरंकारी संत समागमाची विधिवत सांगता झाल्यानंतर दिनांक ३० जानेवारी, २०२३ रोजी औरंगाबादच्या बिडकीन डीएमआयसी येथील मैदानावर सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात अत्यंत मंगलमय वातावरणात ४८ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. साध्या व सामूहिक विवाहांना चालना देण्याच्या संत निरंकारी मिशनच्या […]