Home
जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदान व मतमोजणी तारखेमध्ये बदल. निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय.
प्रतिनिधी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे १२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून ५ फेब्रुवारी २०२६ ऐवजी आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान; तर ७ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल. राज्य निवडणूक आयोगाने […]
श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…
प्रतिनिधी निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा २६ जाने. २०२६रोजी संपन्न झाला.सकाळी ७.४५ वा.मा.ॲड. आदेशजी गिरमे यांच्या शुभहस्ते विद्यालयाचे ध्वजारोहण झाले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ .दिपाली ननावरे यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले व आपल्या प्रास्ताविकामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिनाबद्दल माहिती सांगून विद्यालयांमध्ये राबवले जाणारे विविध […]
करंजे वि.का.सोसायटी करंजे चेअरमनपदी महेश हनुमंतराव शेंडकर यांची बिनविरोध निवङ
प्रतिनिधी. करंजे सोसायटी विध्यमान चेअरमन साहेबराव दगङू गायकवाड यांनी आपल्या ठरलेल्या मुदतीमध्ये चेअरमनपदाचा राजीनामा दिला होता. त्यामूळे रिक्त झालेल्या पदी चेअरमन निवङ घेण्यात आली होती. आज महेश शेंडकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने बारामती सहाय्यक निबंधक प्रमोद दुरगुङे यांनी त्यांची चेअरमनपदी निवङ जाहिर केली. करंजे सोसायटीची स्थापना 1911 सालची आहे करंजे सोसायटीची वार्षिक उलाढाल 8 […]
सहकारनगरातील पद्मावती परिसरात मध्यरात्री वाहनांची तोडफोड, तब्बल १५ वाहनांचे नुकसान
प्रतिनिधी पुणे – सहकारनगरमधील पद्मावती परिसरात बुधवारी मध्यरात्री घडलेल्या वाहन तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खंडाळे चौक परिसरात अडीचच्या सुमारास टोळक्याने बांबू आणि कोयत्याचा वापर करून तब्बल १५ दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिस चव्हाण […]
बीडमध्ये जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांचा मृतदेह कारमध्ये आढळला!!
प्रतिनिधी बीड येथील वस्तू व सेवा कर (जीएसटी) कार्यालयात कार्यरत राज्य कर निरीक्षक सचिन नारायण जाधवर (वय ३५) यांचा मृतदेह शनिवारी दुपारी कपिलधारवाडी परिसरात त्यांच्या स्वतःच्या कारमध्ये आढळला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्रीपासून ते बेपत्ता असल्यामुळे त्यांच्या पत्नीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. प्राथमिक तपासात पोलिसांनी सांगितले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून […]
निंबुत पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीकडून मदनराव काकडे मैदानात उतरण्याची शक्यता.
प्रतिनिधी. नींबूत (ता. बारामती) येथील पंचायत समिती गणातून आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मदनराव काकडे हे उमेदवारीच्या शर्यतीत उतरण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक राजकारणात सक्रिय असलेले मदनराव काकडे यांनी सामाजिक, सहकार आणि विकासात्मक कामांमधून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. नींबूत पंचायत समिती गण हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून, या गणातून राष्ट्रवादी […]
निंबुत पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीकडून मदनराव काकडे यांच्या नावाची जोरदार चर्चा.
प्रतिनिधी. नींबूत (ता. बारामती) येथील पंचायत समिती गणातून आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मदनराव काकडे हे उमेदवारीच्या शर्यतीत उतरण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक राजकारणात सक्रिय असलेले मदनराव काकडे यांनी सामाजिक, सहकार आणि विकासात्मक कामांमधून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. नींबूत पंचायत समिती गण हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून, या गणातून राष्ट्रवादी […]
निंबुत–कांबळेश्वर जिल्हा परिषद गटातून प्रियराज (अभिजीत )सतीशराव काकडे मैदानात?
प्रतिनिधी निंबुत–कांबळेश्वर (ता. बारामती) जिल्हा परिषद गटातून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अभिजीत सतीशराव काकडे हे मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सध्या ते सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून कार्यरत असून, सहकार क्षेत्रात त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अभिजीत काकडे हे सुशिक्षित, तरुण आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले […]
सिनेअभिनेत्री सिमरन खेडकर यांची श्री. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयास सदिच्छा भेट.
श्री. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय निंबुत येथे आज वार शुक्रवार दि. १६/०१/२०२५ रोजी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध व लोकप्रिय अभिनेत्री मा. सिमरन खेडकर यांनी विद्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यांच्या या भेटीमुळे संपूर्ण शालेय परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी अभिनेत्री सिमरन खेडकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आणि […]
शाई पुसून पुन्हा मतदान करण्याचा प्रयत्न गुन्हा – राज्य निवडणूक आयोगाचा इशारा.
प्रतिनिधी. मतदान प्रक्रियेची शुचिता आणि पारदर्शकता अबाधित राखण्यासाठी राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. मतदानाच्या वेळी मतदाराच्या बोटावर लावण्यात येणारी शाई पुसून पुन्हा मतदान करण्याचा कोणताही प्रयत्न हा गंभीर गैरकृत्य असून तो कायद्याने गुन्हा ठरतो, असे आयोगाने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, एखाद्या मतदाराने एकदा मतदान केल्यानंतर त्याची […]