Home
ग्रामीण भागात घरे, कृषीपंपांना वीजदर सवलत, रस्तेविकासाला गती अशा पायाभूत सुविधा आणि लोकोपयोगी योजनांसाठीच्या पुरवणी मागण्या सादर
प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे, मुख्यमंत्री बळीराजा वीजदरसवलत योजनेंतर्गत कृषिपंप ग्राहकांना वीजदर सवलत, केंद्र योजनेअंतर्गत रस्ते व पूल प्रकल्पांसाठी बिनव्याजी कर्जासाठी निधी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना, पुणे रिंग रोड, जालना नांदेड द्रुतगती महामार्गाच्या कामांना गती, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास बळीराजा जलसंजीवनी योजना, शासन अंशदान घटकाखाली विविध प्रकल्पांना […]
सोमेश्वर च्या वजन काट्याची शुक्रवारी अचानक तपासणी. सोमेश्वर चे सर्व वजन काटे अचूक वजन काटा तपासणी पथकाची माहिती.
प्रतिनिधी. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वजन काट्यांची वैद्यमापन शास्त्र विभागाच्या पथकाने अचानक भेट देऊन पाहणी केली याप्रसंगी केलेल्या तपासणीमध्ये सर्व पाचही वजन काटे अचूक ठरले आहेत अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी सांगितले शुक्रवारी दुपार तहसीलदार गणेश शिंदे वैद्यमापनशास्त्र विभागाचे निरीक्षक राजेंद्र टाळकुटे यांच्यासह करंजे पूल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांनी अचानक भेट […]
सोमेश्वर कारखान्यातील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणानंतर कारखाना प्रशासनाने त्वरित तक्रार पेटी बसवावी अशी मागणी सभासद करीत आहेत.
संपादक.मधुकर बनसोडे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात टाईम ऑफिस सह इतर जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर ती कायदेशीर कारवाई करू असे आदेश संचालक मंडळाच्या मासिक मीटिंगमध्ये झाले. मात्र काल उशिरापर्यंत अद्याप कोणावरतीही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती मिळत आहे? नक्की अजून कारखाना प्रशासनाने गुन्हे का दाखल केले नाहीत याची चर्चा सभासद वर्गांमधून मोठ्या […]
श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.दिपाली ननावरे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले व आपल्या प्रास्ताविकात राष्ट्रीय विज्ञान दिनाविषयी माहिती सांगितली तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा असे आवाहन केले. तसेच या कार्यक्रमासाठी प्राथमिक शाळा निंबूत येथील जे […]
मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा व मातृभाषा आहे. असे मत व्याख्याते प्रा. हनुमंत माने यांनी व्यक्त केले.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी, कादंबरीकार व नाटककार वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात, देशभरात आणि जगभरात जिथे मराठी माणसे वास्तव्याला आहेत. तिथे मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. यानिमित्त विविध प्रकारची नाटके, चित्रपट, शास्त्रीय संगीत, काव्य संमेलन, निबंध […]
एम न्यूज मराठी बातमी वरती शिक्का मोर्तब ,सोमेश्वर कारखाना कथित आर्थिक गैरव्यवहारा प्रकरणी कारखान्यातील संबंधीत विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन व तात्काळ गुन्हा दाखल करणार – श्री. पुरुषोत्तम जगताप
प्रतिनिधी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये रोजंदारी बेसिसवर काम करणाऱ्या कर्मचारी व कामगार यांचे हजेरी नोंदीमध्ये संगनमताने कारखाना प्रशासनाची फसवणूक करुन आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी कारखान्याचे लेबर व टाईम ऑफीस विभागातील लेबर ऑफीसर, हेड टाईम किपर, टाईम किपर, सर्व क्लार्क्स व कर्मचारी यांचे निलंबन करण्याचा निर्णय संचालक मंडळाने दि.२७/०२/२०२५ रोजी पार पडलेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेमध्ये घेतला […]
सूत्रांकडून मिळालेला माहितीनुसार “सोमेश्वर कारखान्याचा एका वरिष्ठ अधिकारी महिन्याला दीड लाख रुपयाचा गपला” करत असल्याची स्थानिकांमध्ये चर्चा?
संपादक- मधुकर बनसोडे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये एका वरच्या पदावरती असलेल्या अधिकाऱ्याने सोमेश्वर कारखान्यातीलच एका ठेकेदाराला हाताला धरून महिन्याकाठी दीड ते दोन लाख रुपये चा गपला करत असल्याची चर्चा सध्या सोमेश्वर कारखान्याच्या पंचक्रोशी मध्ये होऊ लागली आहे. उद्या 27 तारखेला संचालक मंडळाची मासिक मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे या मासिक मीटिंगमध्ये देखील या गपला करणाऱ्या […]
पालकमंत्री अजितदादांच्या प्रयत्नांमुळे महिन्याभरातंच मिळाली* *पुणे आणि बीड जिल्ह्याला दोन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालये
बारामती, परळी पशुवैद्यकीय महाविद्यालयांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता अजितदादांच्या घोषणेनंतर महिन्याभरातंच मंजूरी मुंबई, दि. 25 :- उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये दोन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. मागील जानेवारी महिन्यात बारामती येथे आयोजित ‘कृषिक-2025’ प्रदर्शनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बारामती आणि बीड […]
बारामती ! होळ येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये चोरी करण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी – बारामती तालुक्यातील होळ येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र चोरट्यांना यामध्ये अपयश मिळाले . मिळालेल्या माहितीनुसार .. होळ येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये रात्री १२ ते सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे . यामध्ये बँकेच्या पाठीमागील खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश केल्याचे प्राथमिकदर्शनी […]
लोकशाही दिनात एकूण ८ अर्ज प्राप्त-तहसीलदार गणेश शिंदे
बारामती, दि.१७ : नागरिकांचे प्रश्न तालुकास्तरावर मार्गी लावण्याच्या अनुषंगाने तहसील कार्यालयात आयोजित लोकशाही दिनात नागरिकांकडून एकूण ८ अर्ज स्विकारण्यात आले आहेत, प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने उचित कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली आहे. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय नलावडे, सहायक निबंधक प्रमोद दुर्गाडे, वनपरिक्षेत्र […]