प्रतिनिधी.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वजन काट्यांची वैद्यमापन शास्त्र विभागाच्या पथकाने अचानक भेट देऊन पाहणी केली याप्रसंगी केलेल्या तपासणीमध्ये सर्व पाचही वजन काटे अचूक ठरले आहेत अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी सांगितले शुक्रवारी दुपार तहसीलदार गणेश शिंदे वैद्यमापनशास्त्र विभागाचे निरीक्षक राजेंद्र टाळकुटे यांच्यासह करंजे पूल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांनी अचानक भेट देऊन वजन काट्याची पाहणी केली यावेळी दोन ट्रॅक्टर व एक बैलगाडी याची फेर वजन काट्यावरती तपासणी करण्यात आली यावेळी कारखान्यातील इतरही पाच वजन काटे याची देखील फेर तपासणी करण्यात आली तपासणी झाल्यानंतर सदरच्या पथकाने आपला आवाहन कारखाना प्रशासनाकडे स्फूर्ती केला यावेळी शेतकरी जनार्दन पवार, विनायक खोमणे व काही वाहन चालक उपस्थित होते तसेच कारखान्याचे इंजिनियर श्रीकांत दरंदले शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड हे देखील उपस्थित होते.
