Home

1 min read

आंतरराष्‍ट्रीय माहिती अधिकार दिवसानिमित्त नगरपरिषदेत प्रशिक्षण संपन्न.

  बारामती, दि. २७: जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशान्वये आंतरराष्‍ट्रीय माहिती अधिकार दिवसानिमित्त आज बारामती नगर परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी महेश रोकडे, कार्यालय अधीक्षक अश्विनी अडसूळ, ज्ञानमाता सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्‍यक्ष अब्राहाम आढाव, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विविध सामाजिक संस्‍थेचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री. आढाव यांनी माहिती अधिकार […]

1 min read

निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात विद्यार्थ्यांना व पालकांना सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शन तसेच संतुलित पोषण आहाराचे प्रदर्शन …*

निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंतर्गत महिला पोलीस कॉन्स्टेबल यांचे बालकांची सुरक्षितता या समुपदेशन पर कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २६ सप्टेंबर २०२४रोजी सकाळी ११.०० वा.करण्यात आले. यावेळी वडगाव निंबाळकर च्या महिला पोलीस कॉन्स्टेबल रजनी कांबळे, अश्विनी राणे यांनी मुलांना सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधला.सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुचिता […]

1 min read

सोमेश्वरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेवरती पावसाचे संकट येणार का.?

संपादक मधुकर बनसोडे. आज दुपारी एक वाजता सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडत आहे. मात्र हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट घोषित केला आहे आज सकाळीच पावसाला थोड्या प्रमाणात सुरुवात देखील झाली होती. सूर्य देवाचे सकाळपासून दर्शन झालेले नाही मात्र आज सकाळपासूनच ढग दाटून आले आहेत. जर सोमेश्वरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळेस […]

1 min read

अतिपर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घ्यावी*

पुणे, दि. 25: भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्याकरीता आज (दि. 25) रेड अलर्ट आणि उद्या 26 सप्टेंबर रोजी यलो अलर्टचा इशारा दिला असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यातील सर्व धरणे भरलेली असून धरणक्षेत्रात सततधार पडत असलेल्या पावसामुळे पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे धरणांमधून पाण्याचा […]

1 min read

सोमेश्वर ची वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी होण्याची सभासदांमधून चर्चा.!

संपादक मधुकर बनसोडे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी कारखाना कार्यस्थळावरती दुपारी एक वाजता आयोजित केली आहे. मात्र ही सभा अनेक विषयांमुळे वादळी होणार असल्याची चर्चा सध्या सोमेश्वर च्या सभासदांमधून होत आहे. यामध्ये प्रामुख्याने 2023/ 24 च्या गळीत हंगामामध्ये सभासदांच्या ऊस तोडीसाठी झालेला विलंब. ऊसतोड उशिरा झाल्यामुळे सभासदांचे एकरी जवळपास 15 टन ऊस […]

1 min read

धक्कादायक! अंगणवाडीमध्ये बुरशी, जाळे लागलेला आहार पुरवठा

प्रतिनिधी एकात्मिक बालविकास सेवा योजना नागरी प्रकल्पाअंतर्गत अभ्यंकर नगर, हनुमान नगर यासह इतर भागात येत असलेल्या मुक्ताबाई अंगणवाडी केंद्रात महिला बचत गटाच्या माध्यमातून निकृष्ट दर्जाचा आहार पुरवठा रोजी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. हा बालकांच्या जीवाशी खेळ असल्याचा माहिती ,अंगणवाडी सेविका बबिता सारंगपुरे यांनी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे विभाग प्रमुख […]

1 min read

पेट्रोलसाठी पैसे न दिल्याने मित्रावर तीक्ष्ण शस्त्राने वार

प्रतिनिधी पेट्रोल भरण्यासाठी पैसे न दिल्याने एकावर मित्रावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना कोंढवा भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. अरबाज अरिफ सय्यद (वय २८, रा. कुबेरा कॉलनी, एनआयबीएम रस्ता कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत योगेश रामदास लोंढे (वय २८, रा. सोमेश्वर सोसायटी, उंड्री) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. […]

1 min read

संत निरंकारी मिशनचा महिला संत समागम भक्तिमय वातावरणात संपन्न

गंगाधाम, मार्केटयार्ड २३ सप्टेंबर २०२४ : निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या आशीर्वादाने देशभरात महिला संत समागमांचे आयोजन करण्यात येत आहे. या शृंखलेत पुणे झोन गंगाधाम स्थित निरंकारी सत्संग भवनात भव्य महिला संत समागम आयोजित करण्यात आला होता.या संत समागमात पुणे झोनमधील मिशनच्या सर्व शाखांतील हजारो महिला उपस्थित होत्या. सत्संगाच्या मुख्य मंचावरून संबोधित करताना […]

1 min read

वारकरी भवन व बोल विठ्ठला विठ्ठला गीतांचा लोकार्पण सोहळा संपन्न

प्रतिनिधी. मंगळवेढा – तालुक्यातील डोंगरगावाचे सुपुत्र कवी लेखक गीतकार संतसाहित्याचे अभ्यासक डॉ लक्ष्मण हेंबाडे लिखित बोल विठ्ठला विठ्ठला या गीताचा व वारकरी भवनाचा लोकार्पण सोहळा पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार समाधान दादा आवताडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा सत्र न्यायाधीश ह भ प विठ्ठलदादा वासकर प्रमुख पाहुणे गोपाळआण्णा वासकर महाराज सुधाकर इंगळे […]

1 min read

गुंगीचे इंजेक्शन देऊन शाळकरी मुलीवर अत्याचार; शाळेतील तक्रार पेटीमुळे अत्याचाराला वाचा

प्रतिनिधी नात्यातील एका मुलीला गुंगीचे ओैषध असलेले इंजेक्शन देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून आरोपी मुलीच्या नात्यातील आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी २१ वर्षीय तरुण मुलीच्या नात्यातील आहे. मुलीच्या दंडावर गुंगीचे ओैषध असलेले इंजेक्शन आरोपीने दिले. मुलगी बेशुद्ध पडल्यानंतर […]