निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंतर्गत महिला पोलीस कॉन्स्टेबल यांचे बालकांची सुरक्षितता या समुपदेशन पर कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २६ सप्टेंबर २०२४रोजी सकाळी ११.०० वा.करण्यात आले.
यावेळी वडगाव निंबाळकर च्या महिला पोलीस कॉन्स्टेबल रजनी कांबळे, अश्विनी राणे यांनी मुलांना सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधला.सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुचिता साळवे मॅडम यांनी समाजातील काही अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले व सुरक्षे संदर्भात विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.
यावेळी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.दिपाली ननावरे यांनी केले. व आपल्या प्रस्ताविकामध्ये विद्यालयात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबाबत त्यांनी माहिती दिली.
या कार्यक्रमाची सुरुवात संतुलित पोषण आहार प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली. या प्रदर्शनाचे उद्घाटन विस्तार अधिकारी सौ. आगवणे मॅडम, आणि डॉक्टर इनामके यांच्या हस्ते झाले केंद्रप्रमुख दगडे साहेब, तसेच भारतीया फाउंडेशनचे सी.एस.आर. अधिकारी मा. श्री.अजय ढगे साहेब व सायली फुंदे मॅडम, शाला व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.ज्योतीताई लकडे यांच्या उपस्थितीत झाले.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी पोषण आहारातील विविध अन्नघटक यामध्ये प्रथिने,स्निग्ध पदार्थ,कर्बोदके,क्षार व पाणी,जीवनसत्वे यांचे माहिती वजा विविध चार्ट,प्रत्यक्ष ज्यातून हे घटक मिळतात, उपलब्ध होतात ते पदार्थ, काही प्रतिकृती मांडलेल्या होत्या. संतुलित पोषण आहाराच्या प्रदर्शनाची ही संकल्पना उपस्थित पाहुण्यांना खूपच भावली व सर्व विद्यार्थ्यांचे पाहुण्यांनी तोंड भरून कौतुक केले.
कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापिका दिपाली ननावरे व सहकारी शिक्षक श्री.पोपट कोळेकर व श्री.सुरेश येळे यांनी केले. विद्यालयामध्ये बारामतीचे गटशिक्षणाधिकारी माननीय श्री निलेश गवळी साहेब तसेच केंद्रप्रमुख तावरे साहेब यांनी सदिच्छा भेट दिली शालेय वातावरण प्रसन्न व परिसर स्वच्छतेबाबत समाधानकारक शेरा दिला. नींबूत ग्राम विकास प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने व विद्यालयाच्या वतीने त्यांचे मुख्याध्यापिका यांनी शाल ,श्रीफळ देऊन स्वागत केले व आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजाराम भगत यांनी केले व आभार श्री. विजय सूर्यवंशी यांनी मानले.
विद्यालयातील या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.सतीशभैय्या काकडे दे., उपाध्यक्ष मा.श्री.भीमराव बनसोडे,मानद सचिव मा.श्री.मदनराव काकडे यांनी केले.