Home
येरवड्यातील बालसुधारगृहात राडा; डोक्यात फरशी घातल्याने अल्पवयीन मुलगा जखमी
प्रतिनिधी येरवडा येथील पंडीत जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रात मुलाच्या डोक्यात फरशी मारून त्याला जखमी केल्याप्रकरणी अल्पवयीनाविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. येरवड्यात पं. जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्र संचलित बालसुधारगृह आहे. रविवारी (३० जून) दुपारी एकच्या सुमारास बालसुधारगृहातील मुलांना रांगेत उभे करण्यात आले. त्यावेळी एकाने मुलाच्या डोक्यात फरशी (टाइल) मारुन त्याला जखमी केले. त्यावेळी बालसुधारगृाहतील कर्मचाऱ्यांनी […]
*जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मार्गावर अनधिकृत डिजे आणि कमानी न लावण्याचे आवाहन*
प्रतिनिधी. बारामती, दि.३: जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर शहरात गतवर्षी अनधिकृत डिजे आणि कमानींमुळे अडथळा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत डिजे आणि कमानी लावू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी केले आहे. परवानगीशिवाय डिजे आणि कमानी लावल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असेही कळविण्यात आले आहे. श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर बारामती […]
*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत*
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय. : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व […]
*काकडे महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत*.
प्रतिनिधी. सोमेश्वर नगर (०२/०७/२४) येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०२४- २०२५ मध्ये इयत्ता अकरावी कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव श्री सतीशराव लकडे, उपप्राचार्या जयश्री सणस यांच्या शुभहस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी पालक श्री काकडे, सर्व शिक्षक- शिक्षकेतर […]
मेट्रो स्थानकात प्रवाशाचा मृत्यू; सरकत्या जिन्यावरून उतरताना घटना
प्रतिनिधी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकात सोमवारी एका प्रवाशाचा मृत्यू झाला. हा प्रवासी स्थानकातील सरकत्या जिन्यावर अचानक पडला. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, तिथे पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. या प्रवाशाच्या मृत्यूचे नेमके कारण पोलीस तपासत आहेत. या प्रवाशाचे नाव मनोज कुमार (वय ४०) आहे. तो सायंकाळी ६.३० वाजता स्थानकातील सरकत्या जिन्यावरून जात होता. त्यावेळी तो […]
बारामती ! देशात एक जुलै पासून नवीन लागू झालेले कायदेविषयी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे API सचिन काळे यांनी दिली माहिती .
प्रतिनिधी – फिरोज भालदार देशात तीन नवे गुन्हेगारी कायदे सोमवार (१ जुलै) पासून लागू झाले आहेत. भारतीय न्याय संहिता (BNS), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) व भारतीय साक्ष संहिता (BSA) हे तीन नविन कायदे गेल्या डिसेंबरमध्ये संसदेमध्ये संमत करण्यात आले होते. हे तीन कायदे भारतीय दंड संहिता, १८६० (IPC), फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (CrPC) आणि […]
युवकाने आईच्या मदतीने केला भावाचा खून, परस्पर अंत्यविधी करण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी घरात अन्य भावंडांप्रमाणे समान वागणूक मिळत नसल्यामुळे चिडलेल्या मुलाने आई व मोठ्या भावाशी वाद घातला. या वादातून मोठ्या भावाने आईच्या मदतीने लहान भावाचा गळा आवळून खून केला. प्रयाग ऊर्फ बंटी गौर (३४) रा. कुशीनगर असे मृतकाचे नाव आहे. ही घटना जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आई मीरा गौर (६०) आणि मुलगा […]
पोलीस शिपाईच फसला सात लाखांना! प्रकरण काय?
प्रतिनिधी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. सायबर चोरट्यांनी नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. चोरट्यांनी पुणे शहर पोलीस दलातील एका पोलीस शिपायाची सात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका पोलीस शिपायाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार पोलीस शिपाई शिवाजीनगर पोलीस वसाहतीत राहायला आहे. गेल्या वर्षी […]
सुजाता सौनिक राज्याच्या मुख्य सचिव… प्रशासनात महिलाराज
प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलावर्गाला खूश करण्यावर भर देणाऱ्या महायुती सरकारने यापूर्वी दोनदा डावललेल्या सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती केली. त्यांना राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मान मिळाला असून त्यामुळे आता प्रशासन आणि पोलीस दलात महिलाराज प्रस्थापित झाले आहे. सौनिक यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्याचा आदेश काढल्यानंतर रविवारी सायंकाळी मावळते मुख्य सचिव […]
*राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 12 हजार 293 कोटी रुपयांची तरतूद.असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर*
प्रतिनिधी. *महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या* *वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’ घोषित* *पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी* *युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा* *वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना* *प्रतिदिंडी 20 हजार रुपयांचे अर्थसाह्य* *‘निर्मल वारी’साठी 36 कोटींचा निधी* *21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा* *दीड हजार रुपये देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’,* *महिलांना रिक्षा […]