बारामती ! देशात एक जुलै पासून नवीन लागू झालेले कायदेविषयी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे API सचिन काळे यांनी दिली माहिती .

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

देशात तीन नवे गुन्हेगारी कायदे सोमवार (१ जुलै) पासून लागू झाले आहेत. भारतीय न्याय संहिता (BNS), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) व भारतीय साक्ष संहिता (BSA) हे तीन नविन कायदे गेल्या डिसेंबरमध्ये संसदेमध्ये संमत करण्यात आले होते. हे तीन कायदे भारतीय दंड संहिता, १८६० (IPC), फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (CrPC) आणि भारतीय साक्षीपुरावा अधिनियम, १८७२ या कायद्यांऐवजी लागू करणे आले आहेत .

याअनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे सोमवार दि. १ जुलै २०२४ रोजी पोलीस स्टेशन हद्दीतील पत्रकार व नागरिक यांना वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे देशात नवीन लागू झालेले कायद्येविषयक माहिती देण्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यामध्ये सर्व पत्रकार व नागरिक यांनी उपस्थिती दर्शवली होती . संपूर्ण भारत देशात इंडियन पिनल कोड (IPC) व फौजदारी प्रक्रिया संहिता (CRPC), भारतीय पुरावा कायदा हे कायदे बंद होऊन ‘भारतीय न्यायसंहिता’ (BNS), ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता’ (BNNS), भारतीय साक्ष अधिनियम (BSA) हे नवीन कायदे लागू झाले आहेत .

कार्यक्रमामध्ये वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांनी उपस्थित पत्रकार व नागरिकांना नवीन लागू झालेले कायदेविषयी माहिती समजाऊन सांगितली .