Home
गोमाता’ फक्त भाषणातच का? रस्त्यावर फेकल्या जाणाऱ्या वासरांच्या नशिबी मरणयातनाच!
सह संपादक- अक्षय थोरात आपण गायीला ‘माता’ मानतो, तिची पूजा करतो. पण आज समाजातील एक भयाण वास्तव समोर आले आहे. रस्त्यावर सोडून दिलेली, दूध न पिऊ शकणारी आणि स्वतःचा चारा शोधण्यास असमर्थ असलेली निरागस वासरं पाहिली की प्रश्न पडतो— यांचा जन्म काय फक्त लाचारीसाठीच झाला आहे का? ज्या गाईने दूध दिले, तिचे गोऱ्हे […]
सोमेश्वर’चे अनुदान धोरण फसवे; सभासदांची दिशाभूल थांबवा – शेतकरी कृती समितीचा कारखाना प्रशासनावर हल्लाबोल
प्रतिनिधी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने अलीकडेच जाहीर केलेले उसाचे अनुदान धोरण हे पूर्णपणे फसवे असून याद्वारे ऊस उत्पादक सभासदांची शुद्ध दिशाभूल केली जात असल्याचा खळबळजनक आरोप शेतकरी कृती समितीने केला आहे. कारखान्याचे गाळप नियोजन आणि उपलब्ध उसाची आकडेवारी पाहता, जाहीर केलेले अनुदान केवळ कागदावरच राहण्याची चिन्हे असल्याचे समितीने म्हटले आहे. डिसेंबर मध्येच सोमेश्वर च्या […]
बारामती ! कोऱ्हाळे बुद्रुकच्या बस थांब्यावर मुजोर धनदांडग्यांची पार्किंग ; प्रवाशांची गैरसोय
प्रतिनिधी – आधीच अखेरची घटका मोजत असलेल्या कोऱ्हाळे बुद्रुकच्या बस थांब्यावर अनेक जण मोठे फ्लेक्स लावत असतात. त्यातच आता मोठे धन दांडगे राजरोसपणे बस थांब्याच्या समोरच आपल्या गाड्या पार्किंग करत असल्याने प्रवाशांचे मोठी गैरसाई होत आहे. सोमेश्वर कारखाना सुरू झाल्याने बैलगाड्या, ट्रॅक्टर, ट्रॅक अशा ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कोऱ्हाळे वरून सोमेश्वर […]
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी: RDX च्या उल्लेखामुळे शहर हादरले
प्रतिनिधी कोल्हापूर शहराचे प्रशासकीय केंद्र असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाला आज (शुक्रवार) दुपारच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने थेट ई-मेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची गंभीर धमकी दिल्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली. या धमकीच्या मेलमध्ये इमारतीत पाच RDX बॉम्ब ठेवण्यात आले असल्याचा स्पष्ट उल्लेख होता, ज्यामुळे प्रशासनाची तात्काळ धावपळ सुरू झाली. साधारणपणे १२ ते २ वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत […]
कामाच्या तासानंतर ‘डिस्कनेक्ट’ राहण्याचा हक्क: ‘राईट टू डिस्कनेक्ट’ विधेयक संसदेत सादर
प्रतिनिधी कर्मचाऱ्यांच्या ताणमुक्तीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल; खासगी सदस्याचे विधेयक सादर. आधुनिक कार्यशैलीमध्ये कर्मचाऱ्यांवरील वाढता मानसिक ताण आणि कामाच्या तासांनंतरही सतत ‘उपलब्ध’ राहण्याची गरज लक्षात घेऊन, देशात ‘राईट टू डिस्कनेक्ट’ (Right to Disconnect) विधेयक आणण्याच्या मागणीने जोर धरला आहे. खासगी सदस्याच्या स्तरावर हे विधेयक संसदेत सादर करण्यात आले आहे, ज्यामुळे कामाच्या वेळेबाहेरील संपर्कावर मर्यादा येण्याची शक्यता आहे. […]
पुरंदर येथील विमानतळ प्रकल्पबाधित शेतकऱ्यांबरोबर जिल्हाधिकारी यांची झाली सकारात्मक चर्चा.
प्रतिनिधी – पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकरी व ग्रामस्थांच्या जमिनीचा दर, मोबदला व विविध मागण्यांबाबत आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रकल्पग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांसोबत चर्चा केली. प्रकल्पबाधितांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच प्रतिनिधीमंडळासोबत बैठक घेऊन पुढील निर्णयांवर चर्चा करणार असल्याची माहिती श्री. डुडी यांनी दिली. […]
प्रवेशापूर्वी गर्भधारणा चाचणीची सक्ती; चौफेर टीका झाल्यावर नियम तत्काळ रद्द;
प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील एका शासकीय वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी ‘प्रेग्नन्सी टेस्ट’ (गर्भधारणा चाचणी) अनिवार्य करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अजब आणि संतापजनक नियमामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला असून, सामाजिक संघटना तसेच राजकीय नेत्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. वाढत्या दबावानंतर वसतिगृह प्रशासनाने हा नियम तात्काळ रद्द केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे […]
राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या रचनेला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत चर्चा करण्यात आली. या चर्चेची सुरुवात पंतप्रधान मोदी यांनी केली होती.
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरू यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. जेव्हा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांची पाळी आली, तेव्हा त्यांनीही पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. प्रियंका गांधी म्हणाल्या की, वंदे मातरम् वर बंगाल निवडणुकीमुळे वादविवाद होत आहे. त्या म्हणाल्या की, हे सरकार सध्याच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करू इच्छिते. म्हणूनच हे […]
मु.सा काकडे महाविद्यालयातील आर्यवीर पाटील ची दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी.
प्रतिनिधी. सोमेश्वरनगर:दिल्ली येथील श्यामाप्रसाद नॅशनल स्टेडियम येथे १ ते ५ डिसेंबर २०२५ या कालावधीत ६९ व्या नॅशनल स्कूल गेम संपन्न झाल्या.या संपन्न झालेल्या राष्ट्रीय शालेय जलतरण (ब्रेस्ट स्ट्रोक १०० मीटर) स्पर्धेत मु.सा काकडे महाविद्यालयातील आर्यवीर अश्विनकुमार पाटील (इयत्ता १२वी वाणिज्य १९ वर्ष वयोगटात रोप्य पदक प्राप्त करून महाविद्यालयाचे नाव देशपातळीवर उज्वल केले. आर्यवीर चे महाविद्यालयाचे […]
सोमेश्वरने केली एफ.आर.पी. वरील व्याजाची रक्कम जमा
प्रतिनिधी शासनाच्या नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी.) रु.३,२८५/- प्र.मे.टन इतका निघत असून संचालक मंडळाने प्रथम हप्त्यापोटी रु.३,३००/- प्र.मे.टन देण्याचे निश्चित केलेले आहे. दि. १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये गळीतास आलेल्या ऊसाची प्रथम हप्त्याप्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादक सभासदांच्या बँक खात्यामध्ये दि.२९ नोव्हेंबरला वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे […]