Skip to main content

  • Home
  • ताज्या बातम्या
  • मदने कुटुंबीयांकडून वडिलांच्या अस्थी गंगेत विसर्जित न करता झाडांना विसर्जित.
Image

मदने कुटुंबीयांकडून वडिलांच्या अस्थी गंगेत विसर्जित न करता झाडांना विसर्जित.

प्रतिनिधी –

आपल्या पूर्वजांनी काही रूढी आणि परंपरा सुरू केल्या त्या आपण पाळत आलो मात्र काळानुरूप त्यामध्ये काही बदल होत असतात यापूर्वी सुद्धा त्या बद्दल केले गेले.अनेक वेळा असे बदल होत असतात आणि म्हणूनच आजही आपल्याला काही रूढी परंपरा बदलणे गरजेचे आहे. ज्यामध्ये समाज हित आहे ते लक्षात घेऊन या रूढी परंपरा बदलल्या पाहिजेत.असे मत नानासाहेब मदने यांनी व्यक्त केले.

कुरणेवाडी ता. बारामती येथील जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब मदने व पोलिस हवालदार संतोष मदने यांचे पिताश्री तसेच कुरणेवाडी गावचे मा.तंटामुक्ती अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते कै.बाळासाहेब महादेव मदने यांचे निधन झाले होते.त्यांचा सावडण्याचा कार्यक्रम सगोबावाडी येथील राहत्या घराजवळ पार पडला.

मात्र त्यांचा सावडण्याचा कार्यक्रम नंतर अस्थी विसर्जन पाण्यात न करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबियांनी घेतला.मदने यांनी वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ अस्थी व राख विसर्जनावेळी पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून अस्थी व राख नदीमध्ये न विसरजित करता पणदरे विकास मंच सावित्रीबन येथे एक वडाचे झाड लावून त्या झाडाच्या बुंडक्यात टाकण्यात आल्या.त्या झाडाला वडिलांच्या स्मृतीचे प्रतीक म्हणून वाढवण्याचा त्यांनी संकल्प केला आहे.मदने बंधुने लावलेले वडाचे झाड हा उपक्रम फक्त श्रद्धेचा नाही तर नदी प्रदूषण रोखण्याचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार आहे.

मदने कुटुंबाने समाजासमोर प्रेरणादायीक उदाहरण ठेवले आहे. पारंपारिक रुढी पलीकडे जाऊन पर्यावरणासाठी जबाबदारी घेतली पाहिजे हा संदेश या कृतीतून मिळतो. मदने कुटुंबाचा हा प्रयत्न “नदी स्वच्छ ठेवा झाडे लावा” आणि “पर्यावरण वाचवा” या संदेशाला प्रत्यक्ष कृती रूप देणारा ठरला आहे.

यावेळी जादूगार शिवम,बापुराव गोरगल,संतोष शेलार,संभाजी चव्हाण, भाऊसाहेब मदने, पुष्कराज गायकवाड, संभाजी गोरगल,धोंडिबा खोमणे, महेश जाधव, बापुराव मदने, नवनाथ वाबळे आदि मदने कुटूंबिय,नातेवाईक व मित्र परिवार उपस्थित होते..

Releated Posts

रेगुलर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखांचे अनुदान द्यावे; पश्चिम बारामतीतील शेतकऱ्यांची मागणी

प्रतिनिधी सोमेश्वरनगर : पश्चिम बारामती भागातील शेतकऱ्यांची बैठक सोमेश्वरनगर येथे पार पडली. यावेळी नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान…

ByBymnewsmarathi Aug 11, 2026

दारू दुकानांसाठी नवा नियम; सोसायटीची NOC आता बंधनकारक

प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; निवासी संकुलातील मद्यविक्रीला रहिवाशांच्या संमतीची गरज महाराष्ट्र सरकारने राज्यातील दारू दुकानांच्या परवान्याबाबत महत्त्वाचा…

ByBymnewsmarathi Aug 9, 2026

दारू दुकानांसाठी नवा नियम; सोसायटीची NOC आता बंधनकारक

प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; निवासी संकुलातील मद्यविक्रीला रहिवाशांच्या संमतीची गरज  महाराष्ट्र सरकारने राज्यातील दारू दुकानांच्या परवान्याबाबत महत्त्वाचा…

ByBymnewsmarathi Aug 9, 2026

कै. बाबालाल साहेबराव काकडे – देशमुख स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन

प्रतिनिधी. मुगुटराव साहेबराव काकडे महावि‌द्यालय, सोमेश्वरनगर मध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष कै. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ०१…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026