• Home
  • माझा जिल्हा
  • गांजा तस्करीतील गुन्हयामध्ये सुमारे एक वर्षापासुन फरार असलेल्या आरोपी जेरबंद
Image

गांजा तस्करीतील गुन्हयामध्ये सुमारे एक वर्षापासुन फरार असलेल्या आरोपी जेरबंद

संपादक- मधुकर बनसोडे

आरोपी नामे कैलास साहेबराव पवार, वय ३५ वर्षे, रा.गट नंबर ३६६ गडदेवस्ती डोंगरगाव, पेरणे, वाडेबोल्हाई रोड पुणे. याचे राहते घरातुन व चारचाकी गाडीतुन एकुण ३३,४१,९००/- रुपये चा ऐवज त्यामध्ये १२८ किलो ७६५ ग्रॅम गांजा, हा अंमली पदार्थ किं.रु. २५,७५,३००/- रोख रुपये ५०,६००/- एक मोबाईल फोन कि रु १५,०००/- चा एक चारचाकी गाडीतून कि.रु. ७,००,०००/- असा हा अंमली पदार्थ व ऐवज मिळुन आल्याने जप्त करण्यात आला होता. त्यानुसार त्याचे विरुध्द लोणीकंद पोलीस ठाणे ४९/ २०२२ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) ii (क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदर गुन्हयामध्ये आरोपी कैलास पवार यांचेकडे मिळुन आलेल्या १२८ किलो ७६५ ग्रॅम गांजा बाबत तपास करता तो त्याने अहमदनगर येथील इसम नामे किशोर किसनराव जेजुरकर रा. केडगाव, अहमदनगर लोढेमळा याचेकडुन विक्री करीता आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्याअनुषंगाने अहमदनगर येथे जावुन किशोर जेजुरकर याचा शोध घेतला असता तो फरार झाला असल्याचे समजले अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील पोलीस अंमलदार योगेश मोहिते यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लोणीकंद पोलीस ठाणे गु.र.नं. ४९/२०२२ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ ( क ) . २० (ब) ii (क) मधिल पाहिजे आरोपी नामे किशोर किसनराव जेजुरकर रा. केडगाव, अहमदनगर लोढेमळा हा त्याचे रहाते घरी केडगाव येथे आला आहे.

सदरची माहिती त्यांनी पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना कळवुन मिळालेल्या माहिती नुसार केडगाव, अहमदनगर लोढेमळा येथे जावुन नमुद आरोपीस ताब्यात घेणे बाबत सुचना दिल्या होत्या. मा. वरिष्ठांचे परवानगीने व आदेशान्वये बातमीतील ठिकाणी पोहचल्यानंतर आरोपीचे घराभोवती सापळा रचुन अत्यंत शिताफीने त्यास ताब्यात घेतले आहे.वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा पो आयुक्त गुन्हे १ श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार योगेश मोहिते, मनोजकुमार साळुंके, विशाल शिंदे, विशाल दळवी, मारुती पारधी, ज्ञानेश्वर घोरपडे, राहुल जोशी, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, पांडुरंग पवार, सचिन माळवे, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव यांनी केली आहे.

Releated Posts

सोलापुरात संत गजानन महाराज आणि सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या पालखी भेटीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

प्रतिनिधी सोलापुरात संत गजानन महाराज आणि सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या पालखी भेटीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.…

ByBymnewsmarathi Jul 19, 2026

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026