• Home
  • ताज्या बातम्या
  • माळेगाव काॅलनी शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व शैक्षणिक साहित्य वाटप
Image

माळेगाव काॅलनी शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व शैक्षणिक साहित्य वाटप

प्रतिनिधी.

विद्यार्थ्यांचा आनंद मेळावा (आनंद बाजार) उत्साहात साजरा

बारामती – बारामती नगरपरिषद शाळा,माळेगाव काॅलनी येथे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा व बाल आनंद मेळावा (आनंद बाजार) उत्साहात साजरा करण्यात आला‌.बारामती नगरपरिषदेच्या सर्व शाळांमधून सर्वप्रथम शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीचा वर्ग एप्रिल महिन्यात सुरू करण्याचा मान हा माळेगाव काॅलनी शाळेने मिळवला आहे.आत्तापर्यंत जवळपास 20 विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला आहे.शाळेतील शिक्षकांच्या माहितीनुसार आणखी काही विद्यार्थी पुढील दोन ते तीन दिवसात प्रवेश घेतील असे सांगण्यात आले.नवीन‌ विद्यार्थ्यांचे वाजतगाजत,औक्षण करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.उपस्थित मान्यवर श्री.कृष्णमुर्ती जगताप (अध्यक्ष-शाळा व्यवस्थापन समिती माळेगाव काॅलनी),श्री.कल्याण पाचांगणे (माजी अध्यक्ष-शाळा व्यवस्थापन समिती माळेगांव काॅलनी) व पालकांचा सन्मान करण्यात आला.यानंतर इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले,खाऊवाटप व शैक्षणिक शालेय साहित्य वाटप उपस्थितांच्या हस्ते करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.शाळेतील विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाची माहिती होण्यासाठी आनंद बाजार या उपक्रमाचे शाळेत आयोजन करण्यात आले होते.परिसरातील पहिली ते सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या बारामती नगरपरिषद शाळा,माळेगाव काॅलनी येथे आनंद बाजार आयोजित करण्यात आला होता.यावेळी शिक्षक,पालक, विद्यार्थी उपस्थित होते.या आनंद बाजारात विविध खाद्यपदार्थ, भाजीपाला,किराणा,खेळणी आदी वस्तुंची विक्री करण्यात आली.या आनंद बाजारात पालकांनी विद्यार्थ्यांकडून मनसोक्त खरेदी करून विद्यार्थ्यांना व्यवहार कसा करावा याची चालना दिली.या बाजारात 8 ते 10 हजार रुपयांची उलाढाल झाली.हा उपक्रम मुख्याध्यापक सरगर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षक पर्वते सर,सहशिक्षिका चौधरी मॅडम,शेंडे मॅडम,जाधव मॅडम,देवकाते मॅडम, जाधव मॅडम,जगताप मॅडम यांच्यासह अंगणवाडी सेविका बडे मॅडम,मदतनीस कोकरे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.

Releated Posts

निंबुतमध्ये संत सोपानकाका पालखीचे उत्साहात स्वागत; लेझीमच्या तालावर संविधानाचा जागर!

​दि. १४ जुलै संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे आज मंगळवारी दुपारी ठीक ५:०० वाजता निंबुत गावामध्ये अत्यंत भक्तीमय…

ByBymnewsmarathi Jul 14, 2026

अपघातग्रस्त वारकऱ्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली भेट. मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत; जखमींवर मोफत उपचार करण्याचे निर्देश.

पालखी महामार्गावरील अपघातग्रस्त वारकऱ्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली भेट ; जखमींवर मोफत उपचार करण्याचे सूचना देऊन मृतांच्या…

ByBymnewsmarathi Jul 13, 2026

श्री संत तुकाराम महाराज व श्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी बारामती सज्ज-नगराध्यक्ष सचिन सातव

पालखी सोहळा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे-मुख्याधिकारी पंकज भुसे बारामती, दि. ११: श्री संत तुकाराम महाराज पालखीचे…

ByBymnewsmarathi Jul 11, 2026

बारामती! वडगाव निंबाळकर बंगला झोपडपट्टी येथे सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या खोलीकरणाचे काम संत गतीने चालू? ; मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचे यावरती दुर्लक्ष.

प्रतिनिधी- फिरोज भालदार वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत प्रशासनाकडून बंगला झोपडपट्टी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या खोलीकरणाचे काम चालू झाले आहे…

ByBymnewsmarathi Jul 8, 2026