मु. सा. काकडे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
_स्वच्छता, मतदार जागृती, माहितीचा अधिकार व विकसित भारतासाठी युवा सहभागाचा संदेश_
सोमेश्वरनगर, दि. २८ सप्टेंबर २०२६ : मु. सा. काकडे महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष (IQAC) आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना दिन विविध सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. ए. एस. शिंदे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व स्पष्ट करताना युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव निर्माण होणे आवश्यक असल्याचे सांगितले. समाजातील विविध प्रश्नांविषयी युवकांनी संवेदनशील राहून सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक परिवर्तनात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ‘स्वच्छता पंधरवडा’ (१७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर) अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच नवमतदार नोंदणी अभियान, राष्ट्रीय युवा महोत्सव – विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग-२०२७ आणि माहितीचा अधिकार दिनानिमित्त विशेष व्याख्यान अशा विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करण्यात आली.
या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व, मतदार म्हणून असलेली जबाबदारी, माहितीचा अधिकार, लोकशाही प्रक्रियेतील युवकांचा सहभाग तसेच विकसित भारताच्या निर्मितीत युवा शक्तीची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विविध उपक्रमांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आदिनाथ लोंढे, डॉ. जया कदम, डॉ. नारायण राजुरवार, IQAC समन्वयक डॉ. संजू जाधव, उपप्राचार्य प्रा. डॉ. जे. एम. साळवे, उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रवीण ताटे-देशमुख, तसेच डॉ. निलेश आढाव, डॉ. दत्तात्रय डुबल, डॉ. पोपट जाधव यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि IQACच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. आदिनाथ लोंढे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. नारायण राजुरवार यांनी केले.
