Image

निरा नदी प्रदूषणाबाबतचे आरोप निराधार – पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी.

श्री सोमेश्वर सह साखर कारखान्याकडून कोणत्याही प्रकारचे सांड‌पाणी अथवा केमिकलयुक्त पाणी निरा नदीमध्ये सोडले जात नसल्याचे कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून ठामपणे स्पष्ट करण्यात आले आहे. काही व्यक्तींनी कोणताही ठोस पुरावा नसताना कारखान्याविरुद्ध चुकीची व दिशाभूल करणारी माहिती पसरवून कारखान्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी केला आहे. असे आरोप पूर्णतः निराधार असून त्यामागे वैयक्तिक स्वीर्थ व गैरसमज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कारखान्यामध्ये अत्याधुनिक व पर्यावरणपूरक ईटीपी (Effluent Treatment Plant) प्रकल्प कार्यरत असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जाते. या प्रकल्पामध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अशा तिन्ही स्तरांवर सांडपाण्याची शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाते. त्यामुळे प्रक्रिया केलेले पाणी पूर्णतः सुरक्षित व पुनर्वापरासाठी योग्य ठरते. हे पाणी इरिगेशनसाठी तसेच कारखाना परिसरातील हरित क्षेत्रासाठी वापरण्यात येत असून “झिरो डिस्चार्ज” संकल्पनेनुसार कारखाना कार्यरत असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

कारखान्याने केवळ उत्पादन क्षेत्रातच नव्हे, तर पर्यावरणीय जबाबदारीच्या बाबतीतही आदर्श निर्माण केला आहे. राज्यात उच्चांकी गाळप व उच्चांकी साखर रिकव्हरी साध्य करत, सभासद शेतकऱ्यांना नेहमीच स्पर्धात्मक व समाधानकारक दर देण्याची परंपरा कारखान्याने जपली आहे.

दरम्यान, पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने कारखान्याने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत वाघळवाडी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने तब्बल ३५ एकर क्षेत्रात ‘नक्षत्र वनउद्यान’ विकसित केले आहे. या भव्य उपक्रमाअंतर्गत सुमारे ५५०० देशी व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली असून, त्यामध्ये २.५ एकर क्षेत्रात मियावाकी पद्धतीने घनदाट वृक्षारोपण करण्यात आले आहे. यामुळे परिसरातील जैवविविधता वाढण्यास मोठी मदत होत आहे.

या उद्यानाच्या पाणीपुरवठ्यासाठी कारखान्याकडून सुमारे ३ किलोमीटर लांबीची स्वतंत्र पाइपलाईन उभारण्यात आली असून, ईटीपीमधून प्रक्रिया केलेले पाणी थेट उद्यानात पोहोचवले जाते. मागील पाच महिन्यांपासून या उद्यानाला नियमित व शाश्वत पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली. या उपक्रमामुळे पाण्याचा पुनर्वापर होऊन पर्यावरण संवर्धनास मोठा हातभार लागत आहे.

एकूणच, उत्पादन, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकी या तिन्ही क्षेत्रांत संतुलित प्रगती साधणारा श्री सोमेश्वर सह साखर कारखाना हा परिसरासाठी एक आदर्श प्रकल्प ठरत असल्याचे चित्र आहे

Releated Posts

निंबुतमध्ये संत सोपानकाका पालखीचे उत्साहात स्वागत; लेझीमच्या तालावर संविधानाचा जागर!

​दि. १४ जुलै संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे आज मंगळवारी दुपारी ठीक ५:०० वाजता निंबुत गावामध्ये अत्यंत भक्तीमय…

ByBymnewsmarathi Jul 14, 2026

अपघातग्रस्त वारकऱ्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली भेट. मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत; जखमींवर मोफत उपचार करण्याचे निर्देश.

पालखी महामार्गावरील अपघातग्रस्त वारकऱ्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली भेट ; जखमींवर मोफत उपचार करण्याचे सूचना देऊन मृतांच्या…

ByBymnewsmarathi Jul 13, 2026

श्री संत तुकाराम महाराज व श्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी बारामती सज्ज-नगराध्यक्ष सचिन सातव

पालखी सोहळा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे-मुख्याधिकारी पंकज भुसे बारामती, दि. ११: श्री संत तुकाराम महाराज पालखीचे…

ByBymnewsmarathi Jul 11, 2026

बारामती! वडगाव निंबाळकर बंगला झोपडपट्टी येथे सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या खोलीकरणाचे काम संत गतीने चालू? ; मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचे यावरती दुर्लक्ष.

प्रतिनिधी- फिरोज भालदार वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत प्रशासनाकडून बंगला झोपडपट्टी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या खोलीकरणाचे काम चालू झाले आहे…

ByBymnewsmarathi Jul 8, 2026