मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Monday, 28 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 12 May 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

हुंड्याच्या छळातून १८ वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
May 12, 2026 1 मिनिट वाचन 8,534 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

पुण्यातील कोथरूड परिसरात हुंड्यासाठी छळ करून १८ वर्षीय विवाहितेची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्यांनी केला असून, या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मृत तरुणीचे नाव श्रुती सुनील बनसोडे असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रुतीचा विवाह २८ मार्च २०२४ रोजी बुद्धभूषण गायकवाड याच्यासोबत प्रेमविवाह पद्धतीने झाला होता. मात्र, विवाहाच्या वेळी श्रुतीचे वय अवघे १६ वर्षे असल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली आहे. सामाजिक दबाव आणि बदनामीच्या भीतीमुळे कुटुंबीयांनी या विवाहाला संमती दिल्याचेही सांगितले जात आहे.

लग्नानंतर काही दिवसांतच श्रुतीला सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. पती, सासू-सासरे आणि दीर यांनी वारंवार पैशांची मागणी करत तिला त्रास दिला, असा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, या छळाबाबत पोलिसांत तक्रार केल्यास श्रुतीचे काही खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती, असा धक्कादायक आरोपही नातेवाईकांनी केला आहे. या भीतीमुळे पीडित कुटुंब दीर्घकाळ गप्प राहिल्याचे सांगण्यात येत आहे.

४ मे रोजी श्रुतीची अचानक प्रकृती बिघडली. तिला उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाल्याने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना ५ मे २०२६ रोजी तिचा मृत्यू झाला. हा मृत्यू नैसर्गिक नसून जेवणातून विष देऊन तिची हत्या करण्यात आली, असा थेट आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे.

या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करून तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मृत तरुणीच्या नातेवाईकांनी केली आहे. या घटनेमुळे कोथरूड परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत आरोप सिद्ध झालेले नाहीत.)

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख