• Home
  • इतर
  • नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय एमएसएमई मंडळाची (एनबीएमएसएमई ) 19 वी बैठक
Image

नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय एमएसएमई मंडळाची (एनबीएमएसएमई ) 19 वी बैठक

मुख्य संपादक मधुकर बनसोडे

राणे यांनी जागतिक उद्योजकता देखरेख (जीईएम ) भारत अहवाल 2021-22 केला प्रकाशित आणि औपचारिकीकरण प्रकल्पाचा केला प्रारंभ केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय एमएसएमई मंडळाची (एनबीएमएसएमई ) ची 19 वी बैठक झाली. एमएसएमई राज्यमंत्री भानु प्रताप सिंह वर्मा यावेळी उपस्थित होते. केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, विविध उद्योग संघटनांचे पदाधिकारी आणि इतर प्रतिनिधीही या बैठकीला उपस्थित होते.यावेळी नारायण राणे यांनी जागतिक उद्योजकता देखरेख (जीईएम ) भारत अहवाल 2021-22 जारी केला आणि औपचारिकीकरण प्रकल्पाचा प्रारंभ केला. एमएसएमई मंत्रालयाने भारतीय लघु उद्योग विकास बँकेसोबत औपचारिकीकरण प्रकल्पासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या बैठकीत चर्चेदरम्यान, 14 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या राष्ट्रीय एमएसएमई मंडळाच्या 18 व्या बैठकीच्या इतिवृत्तांताला मंजुरी देण्यात आली.

18 व्या बैठकीतील एमएसएमई मंत्रालयाशी संबंधित सर्व शिफारशी लागू करण्यात आल्याचे कृती अहवालात दिसून आले. एमएसएमईशी संबंधित विविध मुद्यांवर म्हणजेच एमएसएमई क्षेत्राचे औपचारिकीकरण आणि पतपुरवठा समस्या,एमएसएमई क्षेत्रातील कामगिरी आणि वेग वाढवणे (आरएएमपी) यासंदर्भात अंमलबजावणी आणि एमएसएमई क्षेत्राची परिभाषा यासंदर्भात मंडळाच्या सदस्यांशी चर्चा करण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थानावरून राणे यांनी सभासदांनी केलेल्या सर्व बहुमूल्य सूचनांचा योग्य तो विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025