• Home
  • क्राईम
  • एक वर्षापासून फरार असलेल्या मोक्कातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट ४ ची अटक
Image

एक वर्षापासून फरार असलेल्या मोक्कातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट ४ ची अटक

प्रतिनिधी

पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने एका मोठ्या कारवाईत एक वर्षापासून फरार असलेल्या मोक्का गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला जेरबंद केले आहे

पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे २) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. येरवडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यातील (गुन्हा रजि. नं. ४३६/२०२५) आरोपींचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांना देण्यात आले होते.

युनिट ४ चे पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार अमदखान शेख आणि तुषार खराडे यांना बातमी मिळाली की, मोक्का गुन्ह्यातील पाहिजे आरोपी ‘कुणाल चांदणे’ हा हडपसर येथील गोंधळेनगर भागात राहत आहे. या माहितीची खात्री पटताच पथकाने गोंधळेनगरमधील ग्रीन ॲव्हेन्यू फ्लॅट नं. १०६ येथे छापा टाकला. तिथे कुणाल उर्फ सोन्या संजय चांदणे (वय २३) हा मिळून आला. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्यातील आपला सहभाग कबूल केला आहे. सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त करत आहेत.

ही यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, सहाय्यक पोलीस फौजदार हरीष मोरे, एकनाथ जोशी आणि युनिट ४ मधील सर्व अंमलदार यांच्या पथकाने केली आहे.

Releated Posts

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक- अक्षय थोरात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका…

ByBymnewsmarathi Jun 14, 2026

ऑनलाईन गेमिंगच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; पुणे पोलिसांनी मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश

प्रतिनिधी ऑनलाईन गेम खेळून अल्पावधीत मोठी कमाई करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या सायबर…

ByBymnewsmarathi Jun 13, 2026

MBBS प्रवेशाचे आमिष दाखवून 40 विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक.

प्रतिनिधी एमबीबीएस अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत राज्यातील अनेक विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक करणाऱ्या तेलंगणातील एकाला येरवडा…

ByBymnewsmarathi Jun 13, 2026

रांजणगाव MIDC मध्ये देहव्यापारावर धाड; सात महिलांची सुटका, दोन अटकेत

प्रतिनिधी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन आणि दहशतवाद विरोधी शाखेने केलेल्या संयुक्त कारवाईत एका लॉजिंगमध्ये चालणाऱ्या देहव्यापाराचा पर्दाफाश केला…

ByBymnewsmarathi Jun 3, 2026