मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 15 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ०४ सराईत गुन्हेगारांवर मकोका कायद्यान्वये कारवाई!

mnewsmarathi 28 Aug 2026 1 मिनिट वाचन 4,601 वाचन

प्रतिनिधी

पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या एका सराईत गुन्हेगार टोळीवर ‘मकोका’ (मोक्का) कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात आली आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४/०६/२०२६ रोजी रात्रीच्या सुमारास घडलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या व दहशत निर्माण करण्याच्या गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे.

​कारवाई केलेले आरोपी

​शोएब रशीद कुरेशी (वय २६, रा. चंद्रनगर, येरवडा, पुणे)

​राज मुकेश सरवदे (वय २१, रा. विमाननगर, विश्रांतवाडी, पुणे)

​हुसेन अस्लम खान (वय २१, रा. चंद्रनगर, येरवडा, पुणे)

​एक विधि संघर्षग्रस्त बालक

​

फिर्यादी उमेश मंगळदास गायकवाड हे त्यांचे मित्र यांच्यासह पंचशील नगर, येरवडा येथे असताना, वरील आरोपींनी पूर्ववैमनस्यातून व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम १०९(१), ११५(२), ३५१(२)(३), ३(५) तसेच हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम व क्रिमिनल अमेंडमेंट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​

सदर गुन्ह्यातील सराईत आरोपींची मूकसहमती आणि सततच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी या गुन्ह्यात ‘मकोका’ कायद्यान्वये कलमे समाविष्ट करण्यासाठी अप्पर पोलीस आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार, दिनांक २६/०६/२०२६ रोजी मकोका १९९९ चे कलम ३(१)(ii), ३(२), ३(४) अन्वये कलमांचा अंतर्भाव करण्यात आला असून, पुढील तपास येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

​ही कारवाई पुणे पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) व पोलीस उपायुक्त (परिमंडल-०४) यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे आणि त्यांच्या तपास पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi