मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 15 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
ताज्या बातम्या

मु.सा.काकडे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

mnewsmarathi 29 Aug 2026 1 मिनिट वाचन 4,180 वाचन

 प्रतिनिधी.

बारामती : तालुक्यातील सोमेश्वर नगर येथील मुसा काकडे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या औचित्य साधून विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये माननीय प्राचार्यांनी मेजर ध्यानचंद यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान व देशाप्रती असलेली त्यांची निस्सिम देशभक्ती याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून तुम्ही देखील त्यांच्या प्रमाणे प्रेरणा घेऊन तुमच्यामध्ये देशभक्ती निर्माण व्हावी तसेच या देशाचे सुसंस्कृत नागरिक होऊन देशाचे नाव महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्वल करावे हाच उद्देश अशा महान व्यक्तींच्या जन्मदिवस साजरा करण्यामागे आहे याबरोबरच तुम्ही सर्वांनी या स्पर्धेत सहभागी होऊन या सर्व स्पर्धा तुम्ही मैत्रीपूर्ण व चुरशीच्या वातावरणात खेळाव्यात या स्पर्धांमुळे तुमच्यामध्ये आत्मविश्वास कष्ट करण्याची सवय इतरांना सहकार्य करण्याची सवय या सर्व गोष्टी तुमच्या मध्ये निर्माण होतील शारीरिक तंदुरुस्ती जिंकण्याची जिद्द पराभवातून पुन्हा उभे राहून जिंकण्याची उर्मी तुमच्यामध्ये निर्माण होईल असे आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात सांगितले या स्पर्धेत 350 पेक्षा अधिक मुलामुलींनी सहभाग नोंदवला प्रास्ताविक शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. बाळासाहेब मरगजे यांनी केले महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश राव काकडे – देशमुख महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत भैय्या काकडे- देशमुख संस्थेचे सचिव सतीश लकडे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या क्रीडा स्पर्धेमध्ये हॉलीबॉल, खोखो, कबड्डी, क्रिकेट या सांघिक खेळाबरोबरच 100 मीटर धावणे 400 मीटर धावणे 5000 मीटर धावणे या मैदानी स्पर्धा त्याचबरोबर इंडोर स्पर्धेमध्ये मनोरंजनात्मक खेळामध्ये रस्सीखेच, दोरी उड्या, प्लांक चॅलेंजेस पुश अप्स यासारख्या खेळांचे यशस्वीपणे आयोजन केले या स्पर्धा दिनांक 27 ते 29 या कालावधीमध्ये पार पडल्या सदर स्पर्धेमध्ये कला शाखेने सांघिक विजेतेपद मिळवून ध्यानचंद ट्रॉफी वर आपले नाव कोरले या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ.श्रीकांत गाडगे एनसीसी विभाग प्रमुख प्रा. डॉ. आदिनाथ लोंढे राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख . प्रा. दत्तराज जगताप श्री. मंगेश गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले

लेखक

mnewsmarathi

M News Marathi