मुख्य मजकुरावर जा
Saturday, 5 September 2026

वडगाव निंबाळकर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक; जबरी चोरीचे १० गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरव. 

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
September 5, 2026 1 मिनिट वाचन 3,501 वाचन

प्रतिनिधी – फिरोज भालदार

 वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या तब्बल १० गुन्ह्यांचा तपास अगदी कमी दिवसात करून त्यांची उकल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल सहायक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते व त्यांचा संपूर्ण स्टाफचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आले.

जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करून १० गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या हस्ते सहायक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांना प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या घटनांचा तपास करताना पोलिसांनी विविध बाबींचा सखोल तपास करून गुन्ह्यांची उघडकीस केली. या कामगिरीमुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण होण्यास मदत झाली असून नागरिकांमध्येही पोलिसांबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुन्ह्यांचा तपास प्रभावीपणे करून त्यांची गुन्हे उघड करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते आणि त्यांच्या संपूर्ण स्टाफ यांनी केलेल्या प्रयत्नांची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी प्रशस्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले.

वडगाव निंबाळकर पोलिसांकडून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून जबरी चोरीच्या १० गुन्ह्यांची उघडकीस ही पोलिसांच्या तपासकौशल्याची महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जात आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख